सायबर गुन्हेगारानी फसवणुकीसाठी योजलेले १० हातखंडे

"सावध राहा आणि सुरक्षित राहा"
सायबर
सावध राहा आणि सुरक्षित राहाBanco
Published on

स्कॅमर (सायबर गुन्हेगार) सर्वसामान्यांची फसवणूक करून त्यांना लुबाडण्यासाठी नेहमीच वेगवेगळे मार्ग शोधात असतात. त्यापैकी त्यांच्याकडून सर्रास योजले जाणारे १० प्रकार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची दक्षता पुढीलप्रमाणे …

Summary
  • TRAI फोन स्कॅम: स्कॅमर तुमच्याकडून गोपनीय माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मोबाईलचा बेकायदेशीर वापर करता किंवा KYC न भरल्याचे कारण सांगून तुमची मोबाईल सेवा बंद करण्याची धमकी देतात.

  • खरे वास्तव: TRAI मोबाईल सेवा बंद करत नाही; फक्त टेलिकॉम कंपन्यांनाच असा अधिकार आहे.

Summary
  • कस्टम"मध्ये अडकलेले पार्सल: स्कॅमर सीमाशुल्क विभागातून बोलतोय असे बेमालूमपणे भासवून तुमच्या पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू आढळल्याचे सांगतात. याबाबत तुमची चौकशी सुरु करण्याची भीती घालतात. या फसवणुकीत काहीवेळा रुबाबदार दिसणाऱ्या, अधिकारी वाटतील अशा ७-८ लोकांसह व्हिडीओ पोस्ट करून संबंधिताला घाबरवून सोडले जाते. सावज भिऊन गलितगात्र झाल्याची खात्री पटल्यानंतर आणि त्याच्याकडून प्रकरण मिटवण्यासाठी काकुळतीला येऊन विनवणी झाल्यावर भला मोठा दंड भरण्याऐवजी अमुक इतकी रक्कम द्या, प्रकरण मिटवतोअसे सांगून लुबाडणूक केली जाते.

  • उपाय: असा फोनआल्यास त्वरित फोन कट करावा आणि या क्रमांकावर फोन आल्याबाबतची तक्रार दाखल करा.

सायबर
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने उभारले सायबर सुरक्षा सुविधा केंद्र
Summary
  • डिजिटल अटक: सायबर गुन्हेगार खोटे पोलीस बनून व्हिडीओ कॉल करतात. तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे दाखवतात. व्हिडिओमध्ये युनिफॉर्ममधील पोलीस पाहूनआणि गुन्हा दाखल असल्याचे ऐकून संबंधित गळपटून जातो. संबंधीताला ऑनलाईन चौकशी करण्याची धमकी दिली जाते. मग चौकशी आणि अटक टाळण्यासाठी मोठ्या रक्कमेचा गंडा घातला जातो.

  • खरे वास्तव: पोलीस कधीही डिजिटल अटक किंवा ऑनलाईन चौकशी करत नाहीत.

Summary
  • नातेवाईकाला अटक: अनेकदा तुमच्या जवळच्या नातलगाला अटक झाली आहे, असे भासवून प्रकरण मिटवण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करून लुबाडले जाते. अशा घटनेत कुटूंबातील सदस्य अटकेत असल्याचे ऐकून सारासार विचार न करता संबंधितांकडून पैसे दिले जातात.

  • उपाय: सर्वप्रथम कुटुंबीयांकडून याबाबत माहिती घेतली तर अशी बेमालूम होणारी फसवणूक नक्कीच टाळता येईल.

Summary
  • झटपट श्रीमंत होण्यासाठी ट्रेडिंग स्कीम: या गुन्हेगारांकडून प्रथम सोशल मीडियावर मोठा परतावा देणाऱ्या शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या जाहिराती दिल्या जातात. झटपट श्रीमंत होण्याची अभिलाषा बाळगणारे गुंतवणुकीद्वारे मिळणार मोठा परतावा, मोठी रक्कम पाहून हरखून जातात आणि इतर ठिकाणी कमी पण हमखास व्याज देणाऱ्या योजनेतील रक्कम काढून त्यांच्याकडे गुंतवतो. मग काही दिवसांनी डोक्याला हात लावून पस्तावतो.

  • खरे वास्तव: अशा जास्त परतावा देणाऱ्या कोणत्याही योजना या फसवणूक करणाऱ्या, लुबाडणाऱ्याच असतात हे वास्तव कधीही विसरता कामा नये.

सायबर
'Traffic Challan' मेसेज : सायबर भामट्यांचा नवा सापळा
Summary
  • ऑनलाईन सोपे काम करा, जास्त पैसे मिळवा : या फसवणुकीला बेरोजगार व्यक्ती अधिककरून बळी पडतात. साध्या सोप्या कामासाठी जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून या योजनेत प्रथम थोडी गुंतवणूक करावी लागेल असे सांगून अनेकांकडून पैसे गोळा करतात आणि पोबारा करतात.

  • खरे वास्तव: ही फसवणूक गरजवंताला अक्कल नसते या म्हणीचा प्रत्यय आणून देते. त्यामुळे सहज होणाऱ्या कामाबद्दल मोठी रक्कम कशी काय देऊ शकतात, अशी शंका चटकन आलीच पाहिजे अन्यथा गुन्हेगारांचे फावते.

Summary
  • तुम्हाला लॉटरी लागलेली आहे: संबंधितांना SMS/ईमेलद्वारे लॉटरी लागल्याचे सांगून त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेऊन गोपनीय त्याचा गैरवापर करून रक्कम लुबाडली जाते. किंवा लॉटरीचे पैसे मिळवण्यासाठी काही रक्कम डिपॉझिट स्वरूपात भरावे लागतील असे सांगून रक्कम साफ केली जाते.

  • उपाय: आपण कोणतेही तिकीट न काढता किंवा बक्षीस मिळवण्यासाठी काहीही न करता आपल्याला कोणी का पैसे देतोय,अशी शंका येथे आलीच पाहिजे. अशा संदेशांकडे दुर्लक्ष करा आणि ते ताबडतोब डिलीट करा.

Summary
  • चुकून पैसे ट्रान्सफर झाले: तुमच्या खात्यात चुकीने पैसे जमा केल्याचे सांगून ते पैसे परत मागतात. गुन्हेगार साळसूदपणे बोलून त्याने तुमच्या खात्यात चुकून रक्कम जमा केल्याचे सांगतात व ते पैसे परत करण्याची विनंती करतात. गोड आर्जवी भाषा वापरून हे गुन्हेगार पैसे लुबाडतात.

  • उपाय: गुन्हेगारांच्या लाघवी बोलण्याला भुलून पैसे परत न करता प्रथम बँकेत असा व्यवहार झाल्याची खात्री करून घ्यावी.

सायबर
ॲक्सिस बँकेची ‘Lock FD’ सुविधा. ठेवींची सायबर फसवणूक रोखणार
Summary
  • KYC कालबाह्य: तुम्ही KYC अपडेट केलेली नाही. तुमची KYC अपडेट करण्यासाठी लिंक पाठवून माहिती देण्यास सांगतात किंवा कॉलवर माहिती मागितली जाते. यामध्ये वेळेवर काम करण्यास चालढकल करणारे ग्राहक आपले काम विनासायास होतेय म्हणून आपली सर्व माहिती या गुन्हेगारांना पुरवून फसतात आणि खाते रिकामे झाले की पस्तावतात.

  • खरे वास्तव: कोणतीही बँक KYC अपडेटसाठी कॉल किंवा लिंक पाठवत नाहीत. बँकाही असा संदेश वारंवार आपल्या ग्राहकांना देत असतात त्याकडे गांभीर्याने लक्ष द्या.

सायबर
ज्येष्ठ मुंबईकराची सायबर फसवणूक: फ्रेंड रिक्वेस्ट पडली ९ कोटींना
Summary
  • मोठ्या रकमेचा कर परतावा मिळण्याचे आमिष : गुन्हेगार कर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून आणि तुम्हाला मोठा कर परतावा मिळणार असल्याचे सांगून तुमच्याकडून खात्याची माहिती मागतात. एकदा का त्यांना माहिती मिळाली की ते आपले काम साधून घेतात. कर परताव्याची रक्कम न मिळत खाते साफ झाल्याचे समजताच नंतर पस्तावण्यापलीकडे काहीच हातात राहत नाही.

  • खरे वास्तव: कर विभागाकडे तुमच्या खात्याची माहिती आधीच माहिती असते आणि ते अशी माहिती न विचारता थेट तुमच्याशी संपर्क साधतात. ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवावी.

बँको विश्लेषण :आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि बँका, पोलीस खाते (सायबर सेल) यांच्याकडून चालवलेला सायबर गुन्ह्यांविरुद्धचा लढा यशस्वी होण्यासाठी वरील माहिती काळजीपूर्वक वाचा. "सावध रहा, सुरक्षित रहा!"
Banco News
www.banco.news