AI मुळे बँकांच्या सायबर सुरक्षेसमोर नवे संकट

Claude Mythos सारख्या अत्याधुनिक AI मॉडेल्समुळे सायबर हल्ल्यांचा वेग वाढला
Claude Mythos
AI
Published on

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे बँकिंग क्षेत्रातील सायबर सुरक्षेचे चित्र पूर्णपणे बदलत आहे. Anthropic कंपनीच्या Claude Mythos या अत्याधुनिक AI मॉडेलने काही मिनिटांतच संगणक प्रणालीतील त्रुटी (Vulnerabilities) शोधून त्यांचा वापर करून हल्ल्याची साखळी तयार करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे मोठ्या बँकांप्रमाणेच प्रादेशिक, सहकारी आणि लहान बँकांनाही वाढत्या सायबर धोक्यांचा गंभीर सामना करावा लागत आहे.

Claude Mythos
सावधान! तुमची बँक सुरक्षित आहे का ? अर्थमंत्र्यांनी दिला हाय-अलर्ट
  • सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, पूर्वी एखाद्या सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधण्यासाठी आणि त्यावर आधारित हल्ला करण्यासाठी अनेक दिवस किंवा आठवडे लागत असत. मात्र AI च्या मदतीने आता सॉफ्टवेअरचे नवीन अपडेट (Patch) प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत त्या अपडेटचे विश्लेषण करून त्यातील त्रुटीचा गैरफायदा घेणारा हल्ला तयार करणे शक्य होत आहे. त्यामुळे पारंपरिक ३० दिवसांचे पॅचिंग चक्र आता अपुरे ठरत असून, बँकांनी तातडीने पॅच व्यवस्थापनाची गती वाढविणे आवश्यक झाले आहे.

Verizon च्या 2026 Data Breach Investigations Report नुसार, तब्बल १९ वर्षांनंतर प्रथमच चोरीला गेलेले पासवर्ड किंवा लॉगिन माहिती यापेक्षा अपडेट न केलेले (Unpatched) सॉफ्टवेअर हे सायबर हल्ल्यांचे प्रमुख प्रवेशद्वार ठरले आहे. याशिवाय, ओपन-सोर्स सॉफ्टवेअरचा वाढता वापर आणि त्यामधील सुरक्षेची स्पष्ट जबाबदारी नसल्यामुळे बँकांना सातत्याने देखरेख ठेवावी लागत आहे.

Claude Mythos
'मायथोस'चे संकट आणि भारतीय बँकिंग समोरिल सुरक्षेचे आव्हान

तज्ज्ञांच्या मते, सायबर सुरक्षेची जबाबदारी केवळ माहिती तंत्रज्ञान (IT) विभाग किंवा मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) यांच्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि मुख्य जोखीम अधिकारी (CRO) यांनीही AI युगातील सायबर जोखमींचा नियमित आढावा घेऊन आवश्यक धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. पॅचिंगसाठी आवश्यक असल्यास काही काळ व्यवसाय प्रक्रियेचा वेग कमी करणे हेदेखील प्रभावी जोखीम व्यवस्थापनाचा भाग मानले जात आहे.

याशिवाय, AI चा वापर केवळ हल्लेखोरच करत नसून बँकांनीही संरक्षणासाठी AI-आधारित सुरक्षा प्रणालींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. AI-आधारित साधने सातत्याने प्रणालीतील त्रुटी शोधणे, संभाव्य हल्ल्यांचे विश्लेषण करणे, जोखमीचे प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि पॅचिंग प्रक्रिया वेगवान करणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

Claude Mythos
सहकारी बँका करणार सुरक्षेसाठी आयटीवर कोट्यवधींची उधळण!

क्लाउड-आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या बँका अधिक जलद गतीने सुरक्षा अपडेट्स लागू करू शकतात. त्यामुळे क्लाउड मॉडर्नायझेशन, कालबाह्य प्रणालींचे आधुनिकीकरण, तृतीय-पक्ष विक्रेत्यांच्या प्रवेशाचे नियमित ऑडिट, ओपन-सोर्स सॉफ्टवेअरचे परीक्षण आणि उद्योगातील इतर बँकांसोबत सायबर धोक्यांची माहिती सामायिक करणे यासारख्या उपाययोजनांना आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे की AI-आधारित सायबर हल्ल्यांचा वेग आणि गुंतागुंत लक्षात घेता, प्रादेशिक आणि सहकारी बँकांनी पारंपरिक सुरक्षा उपायांवर अवलंबून न राहता AI-सक्षम संरक्षण, जलद पॅचिंग व्यवस्था, क्लाउड तंत्रज्ञान आणि सक्षम सायबर जोखीम व्यवस्थापन यांचा तातडीने स्वीकार करणे ही काळाची गरज बनली आहे.

Banco News
www.banco.news