शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! पीक कर्जावर व्याज दर कमी

कर्जाचा आर्थिक ताण होणार कमी - 2025-26 साठी ₹100 कोटींची तरतूद
Crop Loan
पीक कर्जावर व्याज दर कमी
Published on

राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाबाबत राज्य शासनाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार बँका शेतकऱ्यांना ७% व्याजदराने अल्पमुदत पीक कर्ज देतात. मात्र, आता राज्य शासनाच्या अर्थसहाय्यामुळे हा व्याजदर १% ने कमी होऊन ६% पर्यंत येणार आहे.

काय आहे नवीन निर्णय?

  • शेतकऱ्यांना पीक कर्ज ७% ऐवजी ६% दराने मिळणार

  • १% व्याजाचा फरक राज्य शासन उचलणार

  • अल्पमुदत पीक कर्ज (Short Term Crop Loan) यासाठी योजना लागू

  • राष्ट्रीयकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि काही खाजगी बँका यामध्ये सहभागी

Crop Loan
दीर्घकालीन कर्ज योजनेअंतर्गत कृषी सहकारी संस्थांना ५,४०० कोटींचे प्रोत्साहन

किती कर्जावर मिळणार लाभ?

  • ₹3 लाखांपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जावर ही सवलत लागू

  • खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना फायदा

RRकोणत्या बँका देणार कर्ज?

  • राष्ट्रीयकृत बँका

  • प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs)

  • निवडक खाजगी बँका (२०१३-१४ पासून समावेश)

2025-26 साठी निधी स्थिती

  • एकूण तरतूद: ₹100 कोटी

  • वितरित निधी: ₹20.56 कोटी

  • उर्वरित निधी: ₹79.43 कोटी

  • उर्वरित संपूर्ण निधी वितरणास शासनाची मंजुरी

शेतकऱ्यांना काय फायदा?

  • कमी व्याजदरामुळे कर्जाचा आर्थिक बोजा कमी

  • वेळेवर कर्ज उपलब्ध झाल्याने पेरणी व उत्पादनात वाढ

  • ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

Crop Loan
कर्ज थकलं तर जामीनदारही अडचणीत; सर्वोच्च न्यायालयाने दिला स्पष्ट संदेश

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, पीक कर्ज अधिक परवडणारे होणार आहे. ७% ऐवजी ६% दराने कर्ज मिळाल्याने शेती खर्च कमी होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल.

Banco News
www.banco.news