स्वामी विवेकानंद पतसंस्था, आजरामध्ये नोकरीची संधी

सीईओ, सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी अर्जाचे आवाहन
स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्था
स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्था
Published on

आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा ता. आजरा जि. कोल्हापूर या कोल्हापूर, सिंधुदुर्ग व बृहन्मुंबई जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या व १७० कोटी ठेवी व ३२० कोटी व्यवसाय असणाऱ्या राज्यस्तरीय पतसंस्थेकडे खालील पदावर नेमणूक करणेची आहे. तरी खालील पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपला पासपोर्ट साईज फोटो व इतर संबंधित पात्रतेची कागदपत्रे व पगाराच्या अपेक्षेसह १५ दिवसांचे आत खालील पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्था
आजरा अर्बन को-ऑप.बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

पद- मुख्य कार्यकारी अधिकारी / पदसंख्या- १

शैक्षणिक पात्रता व अनुभव- एम.कॉम / एम.कॉम सह जी. डी. सी. & ए. / एम. बी. ए. फायनान्स / एच.डी. सी.एम. / जे.ए.आय.आय.बी. / सी.ए.आय.आय.बी. व संगणक कामकाजाचा अनुभव, मुख्य कार्यकारी अधिकारी / सरव्यवस्थापक / सहाय्यक सरव्यवस्थापक/ सिनिअर ऑफिसर या पदावर किमान १० वर्षांचा सहकारी पतसंस्था / बँकिंगमधील अनुभव असलेल्या ३५ ते ४५ वर्ष वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत.

स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्था
आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती

पद- आय. टी. इंजिनिअरिंग (सॉफ्टवेअर) / पदसंख्या १

शैक्षणिक पात्रता व अनुभव- बी. ई. कॉम्प्युटर / एम.सी.एस / एम.सी.ए. / एम.सी.एम / एम.एस्सी. कॉम्प्युटर (बँकेचा डाटा सेंटर / सॉफ्टवेअर व हार्डवेअर हाताळणीचे कौशल्य, सायबर सिक्युरिटीचे ज्ञान आवश्यक, बँकेमधील प्रत्यक्ष काम केलेला पाच वर्षांचा अनुभव असलेल्या ३० ते ४० वर्ष वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत.)

पत्ता: स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य कार्यालय, मेन रोड आजरा, ता. आजरा, जि. कोल्हापूर पिन कोड नं ४१६ ५०५ फोन नं. (०२३२३) २४६२५४

Email: swamibankajara@gmail.com

आजरा

शिक्का

सही /- सही /-

जनरल मॅनेजर चेअरमन

Banco News
www.banco.news