आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती

पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात
आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकआजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
Published on

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये कार्यरत असलेली आणि १७०० कोटी रुपयांचा व्यवसाय असलेली, ३५ शाखा व आधुनिक डिजिटल बँकिंग सेवा देणारी ‘आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., आजरा(मल्टिस्टेट)’ येथे पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मुख्य कार्यालय (अजरा) तसेच कोल्हापूर येथील विविध विभागांमध्ये जनरल मॅनेजरपासून वरिष्ठ अधिकारी पदांपर्यंत अनेक जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरतीतील पदांचे तपशील, पात्रता व अनुभव

(१) जनरल मॅनेजर / चीफ ऑफिसर (हेड ऑफिस)

  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (M.Com) वाणिज्य शाखेत, एमबीए / जेएआयआयबी / सीएआयआयबी / बँकिंग आणि फायनान्स डिप्लोमा / सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए (फायनान्स) पैकी कोणतेही पात्रता प्रमाणपत्र.

  • अनुभव: सहकारी बँकिंग / अनुपालन / ऑडिट / व्यवस्थापन क्षेत्रात किमान १० वर्षांचा प्रशासकीय अनुभव असावा.

  • वयोमर्यादा: किमान ३५ वर्षे.

  • कामाचा स्वरूप: बँकेच्या सर्व विभागांचे प्रभावी प्रशासन, धोरण राबविणे, शाखांमधील समन्वय, तसेच नियामक अनुपालनाची जबाबदारी.

(२) वरिष्ठ अधिकारी (क्रेडिट, ऑडिट, कंप्लायन्स, रिस्क मॅनेजमेंट)

  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, तसेच एमबीए / जेएआयआयबी / सीएआयआयबी / बँकिंग व फायनान्स डिप्लोमा / सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए (फायनान्स) पैकी कोणतेही.

  • अनुभव: सहकारी बँकिंग क्षेत्रातील क्रेडिट, ऑडिट कंप्लायन्स आणि रिस्क मॅनेजमेंट मध्ये किमान ५ वर्षांचा अनुभव.

  • वयोमर्यादा: किमान ३० वर्षे.

  • कामाचा स्वरूप: कर्ज प्रस्तावांची तपासणी, जोखीम विश्लेषण, आंतरिक तपासण्या, नियामक निर्देशांचे पालन व सुधारणा उपाययोजना करणे.

(३) वरिष्ठ अधिकारी (आयटी)

  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (कंप्युटर सायन्स / ॲप्लिकेशन / डेटा मॅनेजमेंट संबंधित).

  • अनुभव: बँकिंग सॉफ्टवेअर, कोर बँकिंग सिस्टीम, डेटा मॅनेजमेंट व आयटी सोल्यूशन्समध्ये किमान ५ वर्षांचा अनुभव.

  • वयोमर्यादा: किमान ३० वर्षे.

  • कामाचा स्वरूप: बँकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे व्यवस्थापन, सायबर सुरक्षा, डेटा संरक्षण, नवीन तांत्रिक उपाययोजना राबविणे.

(४) वरिष्ठ अधिकारी (कायदेशीर विभाग)

  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (एलएलबी) किंवा पदव्युत्तर पदवी (एलएलएम).

  • अनुभव: सहकारी बँकिंग क्षेत्रातील कायदेशीर कामकाज, विशेषतः SARFAESI कायदा, मध्यस्थी व MCS 2002 कायद्याचे ज्ञान, आणि किमान ५ वर्षांचा अनुभव.

  • वयोमर्यादा: किमान २५ वर्षे.

  • कामाचा स्वरूप: बँकेच्या कायदेशीर प्रकरणांचे मार्गदर्शन, वसुली कारवाई, करार व करारनामे तपासणी, न्यायालयीन कारवाईत बँकेचे प्रतिनिधित्व.

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला बायोडेटा, पासपोर्ट साईज फोटो, शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रती, जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत पुढील ई-मेलवर पाठवाव्यात: gmc@ajarabank.com किंवा प्रत्यक्ष/टपालाने खालील पत्त्यावर अर्ज पोहोचवावा: अजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुख्य कार्यालय, ३९३ बी, मेन रोड, तालुका अजरा, जिल्हा कोल्हापूर – ४१६ ५०५, महाराष्ट्र.

महत्वाची टीप उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा यांच्या आधारे केली जाणार आहे. बँकेच्या व्यवस्थापनाकडे निवड प्रक्रियेचा अंतिम अधिकार राहील.
Banco News
www.banco.news