प्रभात मल्टिस्टेट सोसायटीतर्फे सवलतीच्या दरांत साखर,तेलाचे वाटप

वाटपाचे १४ वे वर्ष: सभासदांत समाधानाचे वातावरण
प्रभात मल्टिस्टेट सोसायटी
प्रभात मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे सभासदांना दिवाळीनिमित्त सवलतीच्या दरात तेल आणि साखरेचे वाटप करताना उपस्थित मान्यवर
Published on

लातूर: येथील प्रभात मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे सभासदांना दिवाळीनिमित्त सवलतीच्या दरात तेल आणि साखरेचे वाटप करण्यात येत आहे. सोसायटीच्या लातूर, धाराशिव, तडवळा व उमरगा येथे शाखा असून सभासद संख्या ५२२३ आहे. संस्थेची मागील वर्षाची उलाढाल २९४.८२ कोटीची असून भागभांडवल ५ कोटी ५ लक्ष, ठेवी ४३ कोटी लक्ष, कर्ज २४ कोटी ५७ लक्ष, गुंतवणूक २७ कोटी ८ लक्ष व स्वनिधी २ कोटी ४७ लक्ष एवढा आहे.

प्रभात मल्टिस्टेट सोसायटी
प्रभात मल्टिस्टेट सोसायटी लातूरची वार्षिक सभा संपन्न

संस्थेला मागील आर्थिक वर्षात ७८ लक्ष ३४ हजार एवढा नफा झाला असून संस्था स्थापनेपासून सभासदास लाभांश देत आली आहे, याही वर्षी संस्थेने सभासदास १० टक्के लाभांश दिलेला आहे. लाभांशा व्यतिरिक्त संस्था दरवर्षी सभासदांना दिवाळी सणात सवलतीच्या दरात साखर व तेल उपलब्ध करून देते. याही वर्षी प्रती सभासद १० किलो साखर रू. ३०/- प्रती किलोप्रमाणे व ५ लिटर हेल्थफीट सुर्यफूल तेल रू. १००/- प्रती लिटरप्रमाणे उपलब्ध करून दिले आहे. अशा प्रकारचे वाटपाचे हे १४ वे वर्ष आहे. संस्थेने सवलतीच्या दरात साखर व तेल उपलब्ध करून दिल्यामुळे सभासदांमधून समाधान व्यक्त होत आहे.

प्रभात मल्टिस्टेट सोसायटी
लातूरच्या राजर्षी शाहू सहकारी पतसंस्थेत गणरायाची प्रतिष्ठापना
Banco News
www.banco.news