
लातूर येथील छ.राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये संस्थापक विजयकुमार शेळके यांच्या हस्ते श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. 'श्री''ची विधिवत पूजा व आरती केल्यानंतर गणरायाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. यावर्षी लातूर येथील छ. राजर्षी शाहू मल्टिस्टेट लातूरच्या मुख्य कार्यालयामध्ये श्रीगणेशाचे आगमन झाले. यावेळी सर्व खातेदारांसह परिसरातील गणेश भक्तांनी पतसंस्थेत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केल्याबद्दल संचालक व सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थचे संचालक अमर सोट तसेच संस्थेचे अधिकारी श्री. यादव, धीरज जाधव, साखरे व सोलापूरे मॅडम आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.