

विटा : सहकार क्षेत्रातील अग्रगण्य आणि बहुराज्य (मल्टिस्टेट) स्तरावर कार्यरत असलेल्या शिवप्रताप नागरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी(मल्टिस्टेट) लि.,विटा यांनी विविध शाखांमध्ये कर्मचारी भरतीची घोषणा केली आहे. संस्थेच्या वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर क्लार्क पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुकांनी दि. १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
संस्थेच्या माहितीनुसार, ही भरती विटा, खानापूर, जत, सांगली तसेच वेजेगाव (ता. खानापूर) येथील ग्राहक सेवा केंद्र (CSP) अशा विविध ठिकाणांसाठी होणार आहे. एकूण ८ क्लार्क पदे भरण्यात येणार असून, त्यामध्ये विटा शाखेसाठी सर्वाधिक ४ पदे, तर खानापूर, जत, सांगली आणि वेजेगाव CSP येथे प्रत्येकी १ पद उपलब्ध आहे.
संस्थेने पदानुसार खालील पात्रता निश्चित केली आहे.
बी.कॉम किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर
MSCIT उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य
काही पदांसाठी १२ वी उत्तीर्ण किंवा पदवीधर पात्रता ग्राह्य राहील.
संगणकाचे ज्ञान अनिवार्य असून, कार्यालयीन कामकाज, संगणक हाताळणी आणि ग्राहक सेवा करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
अनुभवाला प्राधान्य:- जाहिरातीत अनुभवाबाबत स्वतंत्र अट नमूद नसली तरी बँकिंग, पतसंस्था, सहकारी संस्था किंवा आर्थिक क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळू शकते. मात्र, पात्र नवोदित उमेदवारांनीही अर्ज करण्यास हरकत नाही.
पात्र उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह संस्थेच्या मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज सादर करावा. तसेच इच्छुक उमेदवारांना ई-मेलद्वारे अर्ज पाठविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संस्थेने स्पष्ट केले आहे की १२ ऑगस्ट २०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करावा.
शिवप्रताप नागरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.,विटा (मल्टिस्टेट)
शिवप्रताप गोल्ड टॉवर, पॉवर हाऊस रोड,
विटा, ता. खानापूर, जि. सांगली – ४१५३११
ई-मेल : hr.shivpratapho@gmail.com
मोबाईल / व्हॉट्सअॅप : 7208538496