

विटा (सांगली): सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था 'शिवप्रताप मल्टिस्टेट नागरी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.' च्या वतीने 'सोनेतारण विभाग प्रमुख' (Head of Gold Loan Department) या महत्त्वाच्या पदासाठी पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सोनेतारण क्षेत्रातील व्यावसायिक प्रगती आणि विस्तार लक्षात घेऊन संस्थेने या भरतीची घोषणा केली आहे.
संस्थेच्या मुख्य कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पदासाठी केवळ सोनेतारण क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा दांडगा अनुभव असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.
अनुभव: सोनेतारण एनबीएफसी (NBFC), सोनेतारण कंपनी किंवा कोणत्याही बँकेच्या सोनेतारण विभागात किमान ३ वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव अनिवार्य आहे.
कौशल्य: उमेदवाराला सोनेतारण व्यवहार, व्यवसाय विकास (Business Development), कर्ज पोर्टफोलिओ व्यवस्थापन, थकीत कर्ज वसुली (Recovery), जोखीम व्यवस्थापन (Risk Management) आणि शाखा संचालनाचा (Branch Operations) उत्तम अनुभव असावा.
भाषा ज्ञान: मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये प्रभावी संवाद कौशल्य (Communication Skills) असणे गरजेचे आहे.
मुथूट फायनान्स (Muthoot Finance), मणप्पुरम फायनान्स (Manappuram Finance), आयआयएफएल फायनान्स (IIFL Finance), इंडेल मनी (Indel Money), कोसामट्टम फायनान्स (Kosamattam Finance) किंवा तत्सम नामांकित वित्तीय संस्थांमध्ये काम केलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत विशेष प्राधान्य दिले जाईल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले सविस्तर बायोडाटा (Resume) खालील पत्त्यावर अथवा ईमेल आयडीवर पाठवावे:
पत्ता: शिवप्रताप गोल्ड टॉवर, पॉवर हाऊस रोड, विटा, ता. खानापूर, जि. सांगली – ४१५३११
मोबाईल क्रमांक: ७२०८५३८४९६
ईमेल आयडी: hr.shivpratapho@gmail.com
महत्त्वाची नोंद: केवळ सोनेतारण क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांनीच या पदासाठी अर्ज करावा, असे आवाहन शिवप्रताप मल्टिस्टेट प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.