तुमच्या जुन्या बँक खात्यांमध्ये विसरलेले पैसे परत मिळवा

भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केली खास सुविधा!
Bank Account Revival
आपले बँक खाते पुनरुज्जीवित करण्याची आर बी आय तर्फे संधी
Published on

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नागरिकांना त्यांच्या निष्क्रिय किंवा दावा न केलेल्या बँक खात्यांमधील पैसे परत मिळवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. अनेक वेळा लोक जुनी खाती विसरतात किंवा दीर्घकाळ वापरत नाहीत, ज्यामुळे त्यातील रक्कम “डीईए फंड” (Depositor Education and Awareness Fund) मध्ये हस्तांतरित केली जाते. आता आरबीआयच्या UDGAM पोर्टल (https://udgam.rbi.org.in) च्या माध्यमातून ही रक्कम पुन्हा मिळवता येऊ शकते.

काय आहे प्रक्रिया?
जर तुमचे खाते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ वापरलेले नसेल, तर ते ‘निष्क्रिय खाते’ मानले जाते. आणि जर दहा वर्षांपेक्षा जास्त काळ दावा न केलेली ठेव असेल, तर ती रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डीईए फंडात जमा केली जाते. मात्र ही रक्कम तुम्ही किंवा तुमचा कायदेशीर वारस कधीही परत मिळवू शकता.

Bank Account Revival
देशभरात ५६ कोटी जनधन खात्यांपैकी २३% खाती निष्क्रिय

फक्त 3 सोप्या कृतीतुन दावा करा:
1️⃣ तुमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत भेट द्या (ती तुमची मूळ शाखा असणे आवश्यक नाही).
2️⃣ केवायसी कागदपत्रांसह (आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) फॉर्म सादर करा.
3️⃣ पडताळणी झाल्यानंतर, तुमची रक्कम (असल्यास) व्याजासह परत मिळेल.

Bank Account Revival
रिझर्व्ह बँक नागरी सहकारी बँकांना नवे परवाने देणार!

कुठे शोधाल तुमचे विसरलेले पैसे?
भारतीय रिझर्व्ह बँकेचे UDGAM Portal सध्या 30 प्रमुख बँकांची माहिती देत आहे. याशिवाय, ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान देशभरातील सर्व जिल्ह्यांत “दावा न केलेल्या ठेवी” शोध मोहीम शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेचा संदेश:
“जाणकार बना, सतर्क रहा!” —
अधिक माहितीसाठी भेट द्या 👉 https://rbikehtahai.rbi.org.in
अधिकृत व्हॉट्सअँप नंबर: 99990 41935
ईमेल: rbikehtahai@rbi.org.in

Banco News
www.banco.news