KYC फसवणूक: जाणून घ्या खबरदारी व उपाय!

सावधानी घेत चुकीच्या गोष्टी टाळल्या तर निश्चितच फसवणूक टळणार!
KYC
KYC
Published on

KYC फसवणूक: येथे प्रथम KYC म्हणजे काय हे जाणून घेऊया.

KYC म्हणजे Know Your Customer अर्थात ग्राहकाने त्याची ओळख स्पष्ट करण्यासाठी बँकेला दिलेली माहिती.

KYC फसवणूक म्हणजे सायबर गुन्हेगार या ओळख पडताळणी प्रक्रियांचा गैरफायदा घेऊन ग्राहकाची वैयक्तिक माहिती चोरतात, ओळख चोरी करतात किंवा आर्थिक खात्यांमध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळवून पैशांचा अपहार करतात. यामुळे व्यक्ती, व्यवसाय आणि वित्तीय संस्थांसाठी मोठे आर्थिक नुकसान आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर अनिष्ठ परिणाम होऊ शकतो. सामान्य तंत्रांमध्ये लोकांना फसवणे, बनावट दस्तऐवज करणे आणि खोट्या ओळखी तयार करणे यांचा समावेश होतो.

KYC
डिजिटल अरेस्ट घोटाळा: नागरिकांचे अडीच हजार कोटींचे नुकसान

घ्यावयाची खबरदारी (Dos):

  • विनंत्या तपासा: KYC अद्यतन (पडताळणी) करण्याबाबत कोणत्याही विनंत्या आल्यास ताबडतोब थेट आपल्या बँक किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधा.

  • अधिकृत संपर्क वापरा: ग्राहक सेवा तपशील मिळवण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाईट किंवा विश्वासार्ह स्रोतांकडून- संपर्क क्रमांकावरूनच तपशील मिळवा.

  • घटनांची तक्रार करा: जर तुम्हाला सायबर फसवणूक झाल्याची शंका वाटली तर ताबडतोब आपल्या बँक किंवा वित्तीय संस्थेला कळवा.

  • KYC अद्यतन पद्धती तपासा: आपल्या बँकेशी संपर्क साधून KYC माहिती अद्यतन करण्याच्या उपलब्ध पद्धती जाणून घ्या.

KYC
सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे १० हातखंडे !

या गोष्टी टाळा (Don'ts):

  • क्रेडेन्शियल (युजरनेम, पासवर्ड, PIN, OTP) नेहमी सुरक्षित ठेवा: आपल्या खात्याचे लॉगिन तपशील, कार्ड माहिती, PIN, पासवर्ड किंवा OTP कुणासोबतही किंवा अनधिकृत वेबसाईट/ॲपवर शेअर करू नका.

  • दस्तऐवज सुरक्षित ठेवा: KYC दस्तऐवज किंवा त्यांची प्रत अनोळखी व्यक्ती किंवा संस्थांसोबत शेअर करू नका.

  • शंका असलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका: मोबाईल किंवा ईमेलद्वारे प्राप्त शंका असलेल्या किंवा अप्रमाणित लिंकवर क्लिक करू नका.

वरीलप्रमाणे खबरदारी घेऊन चुकीच्या गोष्टी टाळल्या तर याद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून आपण निश्चितच बचाव करू शकतो.

Banco News
www.banco.news