नोकरी बदलली? ITR व्यवस्थित न भरल्यास आयकर विभागाची नोटीस!

ITR भरताना Form 16 बाबत सावध राहा
ITR भरताना  Form 16 बाबत सावध राहा
ITR व्यवस्थित न भरल्यास आयकर विभागाची नोटीस!
Published on
  • आयकर परतावा (ITR) भरण्याचा हंगाम सुरू झाला असून पगारदार कर्मचाऱ्यांसाठी ‘फॉर्म 16’ हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. विशेषतः आर्थिक वर्षात नोकरी बदललेल्या कर्मचाऱ्यांनी आयटीआर भरताना अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. कारण एका वर्षात एकापेक्षा अधिक नोकऱ्या केल्यास दोन किंवा त्याहून अधिक Form 16 मिळू शकतात आणि त्यातील माहिती योग्य प्रकारे एकत्र न केल्यास कर गणनेत चुका होण्याची शक्यता असते.

ITR भरताना  Form 16 बाबत सावध राहा
Revised ITR Form : नव्या आयटीआर फॉर्ममध्ये झाले मोठे बदल!

फॉर्म 16 हे कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या पगारातून कपात करण्यात आलेल्या टीडीएसचे (TDS) अधिकृत प्रमाणपत्र असते. यात कर्मचाऱ्याचे वार्षिक उत्पन्न, कर कपाती, भत्ते आणि सरकारकडे जमा करण्यात आलेल्या कराची माहिती नमूद केलेली असते. या दस्तऐवजाचे Part A आणि Part B असे दोन भाग असतात. Part A मध्ये टीडीएस आणि कर जमा झाल्याची माहिती असते, तर Part B मध्ये पगार, सवलती आणि करपात्र उत्पन्नाचे सविस्तर विवरण दिलेले असते.

आयकर नियमांनुसार कंपन्यांनी दरवर्षी 15 जूनपर्यंत कर्मचाऱ्यांना Form 16 उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठीही हीच अंतिम मुदत लागू आहे. अनेक कर्मचाऱ्यांना Form 16 आयकर विभागाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतो असा समज असतो; मात्र प्रत्यक्षात हा दस्तऐवज केवळ नियोक्ता कंपनीकडूनच जारी केला जातो.

ITR भरताना  Form 16 बाबत सावध राहा
ITR Filing 2026 साठी तुमची कागदपत्रे तयार आहेत का?
  • आर्थिक वर्षात नोकरी बदललेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या आणि नवीन अशा दोन्ही कंपन्यांकडून स्वतंत्र Form 16 मिळतो. अशा वेळी आयटीआर भरताना दोन्ही Form 16 मधील उत्पन्न आणि टीडीएसची माहिती एकत्रित करूनच कर दायित्वाची गणना करणे आवश्यक आहे. केवळ एका Form 16 मधील माहितीच्या आधारे आयटीआर भरल्यास उत्पन्न कमी दाखविल्याचा आक्षेप येऊ शकतो आणि आयकर विभागाकडून नोटीस मिळण्याची शक्यता वाढते.

तज्ज्ञांच्या मते, Form 16 मधील माहिती Form 26AS आणि AIS (Annual Information Statement) शी पडताळून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे कर गणनेतील चुका टाळता येतात तसेच रिफंड प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होते.
ITR भरताना  Form 16 बाबत सावध राहा
ITR Filing 2026: आयकर विभागाकडून ITR-1 आणि ITR-4 फॉर्म जारी; ऑनलाईन फायलिंग सुरू
  • दरम्यान, सर्वसाधारण करदात्यांसाठी ITR-1 आणि ITR-2 दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून, ऑडिटची आवश्यकता नसलेल्या काही करदात्यांसाठी ITR-4 भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे Form 16 प्राप्त होताच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून वेळेत आयटीआर दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Banco News
www.banco.news