कोल्हापूर: श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाटोळेवाडी शाखेचा ३७ वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी चेअरमन किरण पाटोळे, व्हाईस चेअरमन प्रकाश पाटोळे, संस्थापक राजाराम पाटोळे उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात चेअरमन पाटोळे यांनी शाखेचा वाढलेला व्याप व विस्तार स्वप्नवत असून यापेक्षाही मोठी मजल मारू, असा विश्वास व्यक्त केला.
शाखाधिकारी संजय आडूळकर यांनी स्वागत केले. पाटोळेवाडी शाखेने ठेवी ५९ कोटी व कर्जे ४० कोटी असा एकूण ९९ कोटींचा व्यवसाय पूर्ण केला आहे. संस्था आर्थिक वर्षात १०० कोटी ठेवींचा टप्पा पार करेल;असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी संचालक सतीश पाटोळे, दिलीप पाटोळे, राजकुमार तोडकर, राजेंद्र भोसले, प्रा. सुनील भोसले, संचालिका रूपाली पाटोळे, प्रभारी जनरल मॅनेजर नंदकिशोर तोरलेकर व सभासद उपस्थित होते.