
कोल्हापूर पाटोळेवाडी येथील श्री गजानन सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी संदीप पाटोळे, सुषमा शिंदे यांची निवड झाली. संस्था कार्यालयात अध्यक्ष किरण पाटोळे यांनी श्री. पाटोळे व शिंदे यांचा सत्कार केला.
याप्रसंगी अध्यक्ष किरण पाटोळे यांनी, संस्थेस २०२४-२५ मध्ये १.३१ कोटी नफा असून १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा जपली आहे. पाच शाखांद्वारे विस्तारासह संस्थेने भागभांडवल ३.८३ कोटी, ठेवी ८६ कोटी, कर्जे ६६ कोटींचा टप्पा गाठल्याची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश पाटोळे, संस्थापक राजाराम पाटोळे, संचालक सतीश पाटोळे, दिलीप पाटोळे, राजकुमार तोडकर, राजेंद्र भोसले, सुनील भोसले, संचालिका रुपाली पाटोळे व सभासद उपस्थित होते.