
कोल्हापूर पाटोळेवाडी येथील श्री गजानन नागरी सहकारी पतसंथेची ३६ वी वार्षिक सभा नुकतीच महालक्ष्मी मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. सभेत अध्यक्ष किरण पाटोळे यांनी सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर केला. अध्यक्ष किरण पाटोळे म्हणाले, "संस्थेला यावर्षीही 'अ' वर्ग मिळालेला आहे. संस्थेच्या ठेवी ७९ कोटी, कर्जे ५९ कोटी ८५ लाख, स्वनिधी १०६१.५० लाख, गुंतवणूक ३४ कोटी ८४ लाख, खेळते भांडवल ९६ कोटी ३४ लाख असून १ कोटी ३१ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. यंदा संस्थेचा निव्वळ एनपीए १.८२ असून तो शून्यापर्यंत आणण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे."
यावेळी ज्येष्ठ सभासदांसह कर्मचारी, सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार झाला. कार्यकारी संचालक नंदकिशोर तोरलेकर यांनी अहवालवाचन केले. सभेस संस्थापक संचालक राजाराम पाटोळे, सतीश पाटोळे, दिलीप पाटोळे, प्रा. सुनील भोसले, राजकुमार तोडकर, राजेंद्र भोसले, रूपाली पाटोळे आदींसह माजी संचालक, सभासद, कर्मचारी व पिग्मी एजंट उपस्थित होते. उपाध्यक्ष प्रकाश पाटोळे यांनी आभार मानले.