श्री बिरेश्वर को-ऑप सोसायटी 
Co-op Credit Societies

श्री बिरेश्वर को-ऑप सोसायटीच्या कोल्हापूर शाखेचा शुभारंभ

कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा कार्यक्षेत्र असलेल्या सोसायटीची ही २२९ वी शाखा

Pratap Patil, AVIES PUBLICATION

कोल्हापूर : चिक्कोडी (जि. बेळगांव) येथील जोल्ले ग्रुपच्या श्री बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या कोल्हापुरातील शाखेचा शुभारंभ अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. श्री बिरेश्वर को-ऑप.सोसायटीची ही २२९ वी शाखा आहे.

कर्नाटकसह महाराष्ट्र व गोवा कार्यक्षेत्र असलेल्या या सोसायटीचे चार लाख सभासद आहेत. ४ हजार ३३८ कोटींच्या ठेवी तर ३ हजार ३१३ कोटींचे कर्ज वाटप संस्थेने केले आहे. यावर्षी सोसायटीला ४५ कोटी ३५ लाखांचा नफा झाला आहे.

शुभारंभप्रसंगी चेअरमन आप्पासाहेब जोल्ले, व्हाईस चेअरमन आनंद पाटील, ज्योतीप्रसाद जोल्ले यांच्यासह माजी नगरसेवक अनिल कदम, मुख्य कार्यालय संचालक यासीन तांबोळी, ऋषभ जैन, दत्तात्रय पाटील, कोगनोळी शाखाध्यक्ष कुमार पाटील, कणेरी शाखाध्यक्ष एम.डी. पाटील, सुभाष भोजे, दुर्गेश लिंग्रस, विपुल बेळंकी, अमोल कोळी व शाखा कर्मचारी उपस्थित होते. प्रधान व्यवस्थापक बी. ए. गुरव यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्नील यादव यांनी स्वागत केले. उपप्रधान व्यवस्थापक आर.जी. कुंभार यांनी प्रास्ताविक केले. शाखा व्यवस्थापक राजू चौगुले यांनी आभार मानले.

SCROLL FOR NEXT