बिरेश्वर सहकारी पतसंस्थेकडून १५% वाढीव महागाई भत्ता जाहीर

अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्जे, ठेवींत १००% वाढीचे उद्दिष्ट
श्री बिरेश्वर सहकारी पतसंस्था
श्री बिरेश्वर सहकारी पतसंस्था
Published on

बेळगाव येथील दक्षिण भारतातील सर्वात मोठी बहु-राज्यीय पत सहकारी संस्था, श्री बिरेश्वर सहकारी पतसंस्थेने (बेळगाव ) गेल्या आठवड्यात प्रमुख (महत्वाच्या) कामगिरी क्षेत्रांचा (केपीए) आढावा घेण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी शाखा व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.

श्री बिरेश्वर सहकारी पतसंस्था
बिरेश्वर मल्टी-स्टेट पतसंस्थेचा महाराष्ट्रात शाखा विस्तार

बैठकीदरम्यान, अधिकाऱ्यांनी कर्ज, ठेवी आणि विम्यामध्ये सर्वांच्या सहकार्याने १००% लक्ष्ये साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. शाखांनी निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना समर्पित भावनेने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (डीए) १५% वाढ जाहीर केली. या प्रसंगी, सोसायटीने आपल्या नवीन लोगोचे अनावरण केले.

श्री बिरेश्वर सहकारी पतसंस्था
बेळगावच्या श्री बिरेश्वर सहकारी पतसंस्थेचा व्यवसाय ८ हजार कोटींवर

या बैठकीला आमदार श्रीमती शशिकला जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, श्री बिरेश्वर सोसायटीचे संस्थापक अप्पासाहेब जोल्ले, उपाध्यक्ष आनंद पाटील, संचालक मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी आणि इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री बिरेश्वर सहकारी पतसंस्था
श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची बँकेमध्ये रूपांतर होण्याकडे महत्त्वाकांक्षी वाटचाल
Banco News
www.banco.news