
कर्नाटक बेळगावस्थित श्री बिरेश्वर सहकारी पतसंस्था, एकसंबा (मल्टी-स्टेट) ने आपला कारभार विस्तार करताना नुकताच बेंगळुरू शहरातील यशवंतपूर येथे २२७ व्या शाखेचा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे २२८ व्या शाखेचा शुभारंभ केलेला आहे.
यशवंतपूर शाखेचा शुभारंभ संस्थापक श्री.अण्णासाहेब एस. जोल्ले, माजी खासदार चिकोडी आणि सह-संस्थापक सौ. शशिकला ए. जोल्ले, आमदार निपाणी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाला आमदार टी. एन. जवराई गौडा, भाजप नेते श्री. एस. हरीश आणि श्री. जयसिंहा, तसेच वरिष्ठ अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
शिरोळ येथे, श्री मल्लिकार्जुन तपोवन मठ टाकळीचे श्री शिवदेव स्वामीजी यांनी श्री ज्योतिप्रसाद ए. जोल्ले आणि आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि श्री. अशोकराव माने यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत शाखेचा शुभारंभ केला.
सोसायटीचे महाव्यवस्थापक (स्वतंत्र कार्यभार) श्री. बहाद्दूर ए. गुरव म्हणाले की, "सोसायटीचे संस्थापक श्री. अण्णासाहेब एस. जोल्ले आणि सौ. शशिकला ए. जोल्ले यांचे पुत्र श्री. बसवप्रसाद ए. जोल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त हा विस्तार करण्यात आला आहे. यासह, सोसायटी आता कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यात २२८ शाखा चालवत असून ४.१९ लाखांहून अधिक भागधारकांना, ग्राहकांना अखंड सेवा देते आहे."