या भरतीमध्ये गुजरातमध्ये सर्वाधिक २८९ जागा असून, त्यानंतर महाराष्ट्रात १६५, मध्य प्रदेशात १३४, झारखंडमध्ये १३३, कर्नाटकात १२० आणि ओडिशामध्ये १११ पदे आहेत. राजस्थानमध्ये १०६, आंध्र प्रदेशमध्ये ८८, तामिळनाडूमध्ये ६५, पश्चिम बंगालमध्ये ५५, जम्मू-काश्मीरमध्ये ४२, आसाममध्ये ३९, तेलंगणामध्ये ३२, उत्तर प्रदेशमध्ये ३१ आणि छत्तीसगडमध्ये २६ जागा आहेत. याशिवाय चंदीगड व त्रिपुरामध्ये प्रत्येकी २२, पंजाबमध्ये १८, दिल्लीत १७, बिहारमध्ये १२ आणि हिमाचल प्रदेशात ११ जागा उपलब्ध आहेत.
शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराची पदवी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण झालेली असणे अपेक्षित आहे. अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्रात शिकणारे विद्यार्थीही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. मात्र, त्यांना निर्धारित मुदतीपर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
उमेदवाराचे वय २१ ते २८ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. OBC उमेदवारांना तीन वर्षे, तर SC आणि ST उमेदवारांना पाच वर्षांची सवलत आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी नियमानुसार दहा वर्षांपर्यंत वयोमर्यादा सवलत उपलब्ध आहे.
वेतनाचा विचार करता, निवड झालेल्या ज्युनिअर असोसिएटला वेतनश्रेणीनुसार आकर्षक पगार तसेच बँकेच्या नियमानुसार विविध भत्ते आणि सुविधा मिळणार आहेत. दिलेल्या माहितीनुसार वेतन ₹२४,०५० ते ₹१,६४,४८० या श्रेणीत आहे.
या भरतीसाठी General, OBC आणि EWS उमेदवारांना ₹७५० अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC, ST, PwBD आणि माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणी अशा टप्प्यांत केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी परीक्षेची तयारी करताना संबंधित राज्यासाठी लागू असलेल्या स्थानिक भाषेची अट तसेच अधिकृत भरती जाहिरातीतील सर्व नियम काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत भरती पोर्टलला भेट देऊन प्रथम नोंदणी करावी. त्यानंतर मिळालेल्या यूजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर आवश्यक माहिती भरावी. त्यानंतर छायाचित्र, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून लागू असलेले परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआऊट किंवा PDF भविष्यातील उपयोगासाठी जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत भरती जाहिरातीतील पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती, स्थानिक भाषा, शुल्क आणि इतर सर्व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.