बँकिंग क्षेत्रात करिअरची संधी; SBI कडून १,५०० परिवीक्षाधीन अधिकारी पदे

१८ जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू; ८ जुलै अंतिम मुदत
SBI १,५०० परिवीक्षाधीन अधिकारी पदे
SBI १,५०० परिवीक्षाधीन अधिकारी पदे
Published on

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (SBI) परिवीक्षाधीन अधिकारी (Probationary Officer - PO) पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. बँकेत एकूण १,५०० परिवीक्षाधीन अधिकारी पदे भरली जाणार असून पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीसाठी वय, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क तसेच इतर आवश्यक अटी व शर्तींची सविस्तर माहिती एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात क्रमांक CRPD/PO/2026-27/09 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपली पात्रता निश्चित करण्याचे आवाहन बँकेने केले आहे.

ऑनलाइन नोंदणी व शुल्क भरण्याचा कालावधी १८ जून २०२६ ते ८ जुलै २०२६ असा आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज व शुल्क भरण्याची सुविधा एसबीआयच्या करिअर पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेबाबत काही शंका किंवा अडचणी असल्यास उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘Contact Us’ लिंकद्वारे संपर्क साधावा, असे बँकेने म्हटले आहे

बँकिंग क्षेत्रात अधिकारी म्हणून करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही भरती सुवर्णसंधी मानली जात आहे.

Banco News
www.banco.news