कमी CIBIL स्कोअर? काळजी नको! ‘या’ ५ पर्यायांनी मिळू शकते कर्ज 
Co-op Banks

कमी CIBIL स्कोअर? काळजी नको! ‘या’ ५ पर्यायांनी मिळू शकते कर्ज

संयुक्त कर्जापासून गोल्ड लोनपर्यंत जाणून घ्या पर्याय.

Prachi Tadakhe

CIBIL Score: कर्ज घेण्यासाठी आजच्या काळात CIBIL स्कोअर हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. स्कोअर चांगला असेल तर बँक कर्ज मंजूर करते, पण स्कोअर कमी असेल तर अनेकदा अर्ज फेटाळला जातो किंवा जास्त व्याजदर लावला जातो. मात्र, कमी सिबिल स्कोअर असूनही कर्ज मिळण्याचे काही पर्याय उपलब्ध आहेत. तर जाणून घ्या हे ५ प्रभावी मार्ग —

१. जॉईंट लोन घ्या — सह-अर्जदार स्कोअरने मिळते मदत

तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर ‘संयुक्त कर्ज’ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्ही अशा व्यक्तीसोबत अर्ज करता ज्यांचा सिबिल स्कोअर उत्कृष्ट आहे. सह-अर्जदाराचा चांगला स्कोअर आणि मजबूत आर्थिक स्थिती पाहून बँक कर्ज मंजूर करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. हाऊसिंग लोन आणि पर्सनल लोनसाठी हा पर्याय अधिक वापरला जातो.

२. एनबीएफसीकडून कर्ज — कमी स्कोअरवरही उपलब्ध

बँकांनी नकार दिल्यास Non-Banking Financial Companies (NBFCs) कर्ज देण्यास तुलनेने अधिक सक्षम असतात. कमी सिबिल स्कोअरवरही ते कर्ज मंजूर करतात. मात्र, जोखीम जास्त असल्याने NBFCs बँकांच्या तुलनेत व्याजदर जास्त आकारतात. तातडीच्या गरजेसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.

३. अ‍ॅडव्हान्स सॅलरी लोन — कंपनीकडून मिळतो आधार

सध्या अनेक खाजगी कंपन्या कर्मचारी-केंद्रित सुविधा म्हणून अ‍ॅडव्हान्स सॅलरी किंवा सॅलरी अ‍ॅडव्हान्स लोन देतात.

  • हे कर्ज तुमच्या मासिक पगारावर आधारित असते.

  • कर्जाची रक्कम २ ते ३ पट पगारापर्यंत मिळू शकते.

  • EMI थेट पगारातून कपात होत असल्यामुळे कर्ज देताना CIBIL स्कोअरची कठोर तपासणी केली जात नाही.

कमी स्कोअर असलेल्या नोकरदारांसाठी हा सर्वात सोपा आणि जलद पर्याय मानला जातो.

४. गोल्ड लोन — स्कोअर तपासला जात नाही

तुमच्याकडे सोने असल्यास गोल्ड लोन हा सर्वात सोपा मार्ग आहे.

  • बँका आणि वित्तीय संस्था सोन्याच्या बदल्यात कर्ज देतात.

  • हे सुरक्षित कर्ज (secured loan) असल्यामुळे CIBIL स्कोअरची गरज नसते.

  • व्याजदरही तुलनेने कमी असतो आणि प्रक्रिया त्वरित होते.

कर्ज नाकारले गेले तरी हा पर्याय नेहमीच उपलब्ध असतो.

५. एफडीवर कर्ज — कमी व्याजदरात सर्वोत्तम पर्याय

जर तुमची बँकेत Fixed Deposit (FD) असेल तर त्यावर ९०% पर्यंत कर्ज घेता येते.

  • FD हे तारण (collateral) असल्याने बँक तुमचा सिबिल स्कोअर तपासत नाही.

  • व्याजदरही FD च्या व्याजापेक्षा फक्त १-२% जास्त असतो.

  • कर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी.

कमी स्कोअर असलेल्या व्यक्तीसाठी हा सर्वात विश्वासार्ह व किफायतशीर मार्ग मानला जातो.

सिबिल स्कोअर कमी असल्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कर्ज मिळणारच नाही. जॉईंट लोन, एनबीएफसी, सॅलरी अ‍ॅडव्हान्स, गोल्ड लोन आणि FD तारण कर्ज असे अनेक पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. योग्य पर्याय निवडून तुम्ही तातडीच्या गरजांसाठी आवश्यक आर्थिक मदत सहज मिळवू शकता.

SCROLL FOR NEXT