अचानक खर्च? गोल्ड लोन vs पर्सनल लोन: सर्वात फायदेशीर कोणते?

कर्ज घेण्यापूर्वी समजून घ्या दोन्ही पर्यायांमधील खरा फरक.
Gold Loan Rate Today
अचानक खर्च? गोल्ड लोन vs पर्सनल लोन: सर्वात फायदेशीर कोणते?
Published on

वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग, शैक्षणिक गरज, घरातील दुरुस्ती, व्यवसायातील तात्पुरती अडचण किंवा लग्नसमारंभ. आर्थिक दडपण वाढताना लोकांसमोर सर्वात सहज उपलब्ध असलेले दोन पर्याय म्हणजे सोन्यावर कर्ज (गोल्ड लोन) आणि वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन). दोन्ही कर्जप्रकार गरज भागवतात, पण त्यांचा खर्च, गती, सुरक्षितता आणि लवचिकता यांमध्ये मोठा फरक आहे. योग्य निवड केली तर व्याजात मोठी बचत होऊ शकते, तर चुकीचा पर्याय दीर्घकाळ आर्थिक ताण निर्माण करू शकतो.

तारण ठेवलेल्या सोन्यामुळे गोल्ड लोनचा व्याजदर पर्सनल लोनपेक्षा कमी असतो. कर्ज देणाऱ्याचा धोका कमी असल्याने दर अधिक परवडणारे ठरतात. दूसरीकडे पर्सनल लोन पूर्णपणे असुरक्षित असते, त्यामुळे त्याचा दर तुमच्या क्रेडिट स्कोअर, उत्पन्न, नोकरीचा प्रकार आणि पूर्वीच्या कर्ज इतिहासावर अवलंबून मोठ्या प्रमाणात बदलतो.

  1. क्रेडिट प्रोफाइल उत्तम असेल तर पर्सनल लोनचे दर आकर्षक मिळू शकतात

  2. पण मध्यम/कमकुवत प्रोफाइल असेल तर ते खूपच महागडं ठरू शकतं

पैसे किती लवकर मिळतात?

गोल्ड लोन सर्वात वेगवान मानले जाते.
केवळ सोन्याचे मूल्यांकन आणि KYC पूर्ण झाल्यावर अनेक बँका/एनबीएफसी त्याच दिवशी रक्कम खात्यात जमा करतात.

पर्सनल लोनही जलद असू शकते, विशेषतः पूर्व-मंजूर ऑफर असल्यास. पण बहुतांशवेळी उत्पन्न, नोकरी आणि क्रेडिट तपासणीमुळे प्रोसेस थोडी लांबते.

जर वेळ अत्यंत महत्वाचा असेल आणि सोने उपलब्ध असेल तर गतीमध्ये गोल्ड लोनच आघाडीवर.

Gold Loan Rate Today
रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण-मर्यादेत राहूनच सोने-चांदीवर कर्ज घेता येणार

कोणते कर्ज अधिक ‘सुरक्षित’?

गोल्ड लोनमध्ये:

  • तुमचे दागिने सुरक्षित तारण म्हणून ठेवले जातात

  • परंतु कर्ज न भरल्यास त्यांचा लिलाव होऊ शकतो – हा तुमच्यासाठी मोठा मालमत्ता धोका

पर्सनल लोनमध्ये:

  • कोणीही वस्तू तारण नाही, त्यामुळे दागिने वाचतात

  • पण हप्ता चुकल्यास दंड, वसुलीचा दबाव आणि क्रेडिट स्कोअरचे नुकसान होऊ शकते

दोन्हीमध्ये धोके आहेत, पण प्रकार वेगळा आहे.

कालावधी व लवचिकता: गरज कोणत्या प्रकारची आहे?

गोल्ड लोनसाठी आदर्श कालावधी:

कमी ते मध्यम— काही महिने ते एक वर्ष.

ते तात्पुरत्या आर्थिक तुटी भरून काढण्यास उत्तम ठरते. लवकर परतफेड शक्य असल्यास एकूण व्याज खूपच कमी येते.

पर्सनल लोनसाठी आदर्श कालावधी:

मध्यम ते दीर्घ— 1 ते 5 वर्षे.

नियमित मासिक हप्ता (EMI) हवा असेल, किंवा रोख प्रवाह दीर्घकाळ तंग असेल तर हा पर्याय सोयीस्कर.

अनियमित उत्पन्न असल्यास— दंडाशिवाय अंशतः प्रीपेमेंट करता येते का ते तपासा.

Gold Loan Rate Today
सोने तारण कर्ज: सहकारी बँकांना व्यवसायवाढीची "सुवर्ण"संधी!

व्यावहारिक उदाहरण:

समजा तुम्ही ₹2 लाख कर्ज घेत आहात:

  • गोल्ड लोन (कमी व्याज + 6 महिने कालावधी)
    एकूण व्याज कमी— कारण कालावधी कमी आणि दरही कमी

  • पर्सनल लोन (उच्च दर + 2 वर्षे कालावधी)
    मासिक EMI छोटा असेल, पण एकूण व्याज खूप जास्त

लवकर परतफेड करण्याची क्षमता असेल तर गोल्ड लोन स्वस्त ठरते.

निर्णय घेण्यापूर्वी तपासण्याच्या 8 महत्त्वाच्या गोष्टी

  1. व्याज कसे गणले जाते — दररोज कमी होणारे का?

  2. प्रक्रिया शुल्क

  3. प्रीपेमेंट/फोरक्लोजर चार्जेस

  4. टॉप-अपची सुविधा आहे का?

  5. गोल्ड लोनसाठी:

    • स्टोरेज आणि विमा

    • लिलावापूर्वीची नोटीस

    • व्याज कसे जमा होते

  6. पर्सनल लोनसाठी:

    • तुमच्या क्रेडिट लिमिटवर परिणाम

    • EMI तुमच्या मासिक बजेटमध्ये बसते का?

  7. दंड/लेट फीची रचना

  8. कोणता पर्याय तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेशी जुळतो?

  • सोने उपलब्ध असेल, पैसे तत्काळ हवे असतील आणि परतफेड जवळच्या काळात शक्य असेल—
    गोल्ड लोन हा सर्वात स्वस्त, जलद आणि व्यावहारिक पर्याय.

  • दागिने तारण ठेवायचे नसतील, दीर्घ हप्ते हवे असतील आणि क्रेडिट स्कोअर चांगला असेल
    पर्सनल लोन सोयीचे पण तुलनेत महागडे.

कर्जाचा प्रकार हा तुमच्या गरज, कालावधी, परतफेडीची क्षमता आणि मालमत्ता जोखिम यांच्याशी जुळवून निवडा. फक्त व्याजदर पाहून निर्णय घेऊ नका— एकूण खर्च, दंड, लवचिकता आणि भविष्यातील ताण यांची तुलना करा.

Banco News
www.banco.news