देशभरातील पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! वार्षिक जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) किंवा डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ जवळ आली आहे. देशातील सुमारे ६.८७ दशलक्ष पेन्शनधारकांनी आपले प्रमाणपत्र वेळेत सबमिट करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा त्यांचे मासिक पेन्शन थांबू शकते. केंद्र सरकारने अद्याप अंतिम तारीख वाढवण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.
राज्य व केंद्र सरकारच्या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. पेन्शन मिळत राहण्यासाठी ते दरवर्षी एकदा सबमिट करावे लागते. हे प्रमाणपत्र एक वर्षासाठी वैध असते.
प्रत्येक पेन्शनधारकाने खालील माहिती अचूक द्यावी:
आधार क्रमांक
पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) क्रमांक
पेन्शन येणारे बँक खाते
आधारशी जोडलेला मोबाईल नंबर
डिजिटल एलसी हे आधार-आधारित बायोमेट्रिक सिस्टमवर कार्य करते.
प्रक्रिया अशी:
आधारद्वारे फिंगरप्रिंट/फेस आयडी किंवा आयरिस स्कॅनद्वारे प्रमाणीकरण होते.
यशस्वी प्रमाणीकरणानंतर एलसी तयार होऊन केंद्र सरकारच्या रेपॉझिटरीमध्ये साठवलं जातं.
तुमची बँक किंवा पोस्ट ऑफिस हे प्रमाणपत्र ऑनलाइन अॅक्सेस करू शकतात.
सबमिशननंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन आयडी एसएमएसने मिळतो.
तुम्ही जीएलसीचे स्टेटस स्वतः तपासू शकता.
आधार क्रमांक तुमच्या बँकेकडे/पोस्ट ऑफिसकडे नोंदणीकृत असल्याची खात्री करा.
तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप्स इन्स्टॉल करा:
AadhaarFaceRD
Jeevan Pramaan Face App
फोनचा फ्रंट कॅमेरा किमान 5MP असावा.
अॅप उघडा आणि पेन्शनधारकाचा चेहरा स्कॅन करून फोटो काढा.
आवश्यक माहिती (आधार, PPO, खाते क्रमांक) भरा.
सबमिट करा.
तुमच्या मोबाईलवर मिळालेल्या एसएमएसमधील लिंक उघडून प्रमाणपत्र डाउनलोड करा.
अधिकृत वेबसाइट: jeevanpramaan.gov.in
३० नोव्हेंबरपर्यंत एलसी सादर केला नसेल, तर तुमचे पेन्शन तात्पुरते थांबवले जाऊ शकते.
पेन्शन जमा न झाल्यास, जीवन प्रमाणपत्र Central Pension Processing Centres (CPPC) ला पाठवले आहे का, हे तपासा.
सीपीपीसीने प्रमाणपत्र मंजूर केल्यानंतर थांबलेले पेन्शन परत जमा होते.
डिजिटल लाइफ सर्टिफिकेट नाकारले जाण्याची सामान्य कारणे
चुकीची माहिती (आधार, PPO, खाते तपशील)
बायोमेट्रिक स्कॅन खराब / अपूर्ण असणे
कमी दर्जाचा फिंगरप्रिंट किंवा फेस स्कॅन
काय करावे?
नकाराचा SMS मिळाल्यानंतर तुमच्या बँक/पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.
समस्या दूर करा.
पुन्हा बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून नवीन प्रमाणपत्र तयार करा.
‘जीवन प्रमाण’ ही आधार-आधारित डिजिटल सेवा पेन्शनधारकांचे “जिवंतपणा प्रमाणपत्र” ऑनलाइन देते.
यामुळे त्यांना पेन्शन कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज राहत नाही.
यात सहभागी संस्था:
DoT
रेल्वे
UIDAI
MeitY
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
CGDA
१९ पेन्शन वितरण बँका