'हा फोटो तुमचाच काय?'... व्हॉट्सॲपच्या एका 'क्लिक'वर २७ हजार गायब

कोणताही OTP नाही, कोणताही पासवर्ड नाही; केवळ एका स्क्रीन स्पर्शाने तरुणाच्या आयुष्याची कमाई गायब! काय आहे या 'ब्लॅक होल' मेसेजचे रहस्य?
सावधान! तुमच्या व्हॉट्सॲपवरही असा मेसेज आलाय? राधानगरीतील 'त्या' एका क्लिकमागचं धक्कादायक रहस्य!
सावधान! तुमच्या व्हॉट्सॲपवरही असा मेसेज आलाय? राधानगरीतील 'त्या' एका क्लिकमागचं धक्कादायक रहस्य!
Published on

राशिवडे : तुमच्या व्हॉट्सॲपवर एखाद्या अनोळखी नंबरवरून एखादा फोटो किंवा फाईल आली आणि तुम्ही ती फक्त 'काय आहे' हे बघण्यासाठी ओपन केली, तर तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे होऊ शकते! होय, हे अगदी खरे आहे. सायबर चोरांनी आता सर्वसामान्यांना लुटण्याचा एक अत्यंत सोपा आणि तितकाच धोकादायक मार्ग शोधला आहे.

"व्हॉट्सॲपवर पाठवलेला दुकानाचा फोटो तुमचाच आहे का?" अशी साधी विचारणा करून सायबर भामट्यांनी राधानगरी तालुक्यातील एका तरुणाला तब्बल २७ हजार रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या तरुणाने कोणालाही आपला बँक पासवर्ड किंवा ओटीपी (OTP) दिला नव्हता, तरीही केवळ एक फाईल ओपन करताच त्याचे पैसे गायब झाले. या नव्या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील एका युवकाला मोबाईलवर एक अनोळखी फोन आला. समोरील व्यक्तीने, "तुम्ही आमच्या बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले असून त्याचे हप्ते थकले आहेत," असे सांगत पैशांची मागणी केली. यावर तो तरुण गोंधळात पडला. त्याने स्पष्ट सांगितले की, "माझे कोणतेही दुकान नाही आणि मी कोणतेही बँक कर्ज घेतलेले नाही."

युवकाने नकार देताच समोरील भामट्याने आपली खरी चाल खेळली. तो म्हणाला, "असं कसं म्हणता? मी तुमच्या व्हॉट्सॲपवर एक फोटो पाठवला आहे, तो तुमच्याच दुकानाचा आहे का तेवढं एकदा बघून घ्या."

सावधान! तुमच्या व्हॉट्सॲपवरही असा मेसेज आलाय? राधानगरीतील 'त्या' एका क्लिकमागचं धक्कादायक रहस्य!
Whatsapp हॅक! ओटीपी न देता खात्यातून लाखोंची फसवणूक

आपल्या नावावर नक्की कसले दुकान आहे, हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी त्या तरुणाने व्हॉट्सॲप उघडले आणि आलेल्या त्या फोटोसारख्या दिसणाऱ्या फाईलवर क्लिक केले. ती फाईल ओपन होताच, काही सेकंदांच्या आत त्या तरुणाच्या मोबाईल स्क्रीनवर एक धक्कादायक मेसेज आला. त्याच्या सेव्हिंग बँक खात्यातून थेट २७ हजार रुपये वजा (Debit) झाले होते.

कोणताही पासवर्ड किंवा ओटीपी शेअर न करता, केवळ एक मेसेज ओपन केल्यामुळे खात्यातील पैसे उडाल्याचे पाहून तरुणाला चांगलाच घाम फुटला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने तातडीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहेत.

अनेकांना प्रश्न पडतो की ओटीपी न सांगता पैसे कसे काय जाऊ शकतात? सायबर तज्ज्ञांच्या मते, चोरांनी पाठवलेली फाईल हा कोणताही साधा फोटो नसतो. तो एका प्रकारचा व्हायरस असतो (ज्याला .apk फाईल म्हणतात).

  • आपण त्यावर क्लिक करतो, तेव्हा तो व्हायरस नकळत आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतो.

  • यानंतर चोरांना तुमच्या मोबाईलचा आणि बँकेच्या मेसेजचा ताबा मिळतो.

  • यामुळे ते तुमच्या खात्यातून पैसे चोरतात आणि तुम्हाला येणारा मेसेजही ब्लॉक करू शकतात.

सावधान! तुमच्या व्हॉट्सॲपवरही असा मेसेज आलाय? राधानगरीतील 'त्या' एका क्लिकमागचं धक्कादायक रहस्य!
मोबाईलवर आलेली 'ती' फाईल उघडली... अन् खातं रिकामं!

नागरिकांनो सावधान! 'या' ३ गोष्टी कधीच करू नका:

१. अनोळखी फाईल्स उघडू नका: व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबरवरून 'हा फोटो तुमचा आहे का?', 'तुमची लॉटरी लागली आहे' किंवा कुठल्याही फाईल्स आल्यास त्यावर क्लिक करू नका.

२. घाबरून निर्णय घेऊ नका: बँक कर्ज थकले आहे किंवा वीज बिल भरले नाही, असा फोन आल्यास आधी शांत राहा. फोनवर बँक खात्याची कोणतीही माहिती देऊ नका.

३. तातडीने येथे तक्रार करा: जर कधी अशी फसवणूक झाली, तर पहिल्या २ तासांच्या आत आपल्या बँकेला कळवून खाते ब्लॉक करा आणि 1930 या सायबर हेल्पलाईन नंबरवर तातडीने तक्रार नोंदवा.

लक्षात ठेवा, तुमची एक छोटीशी उत्सुकता तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. सतर्क राहा, सुरक्षित राहा!

Banco News
www.banco.news