पीपीएफ खातेदारांनो भरा 'हा' फॉर्म, नाहीतर होईल मोठं नुकसान

जाणून घ्या पीपीएफचा सर्वात महत्त्वाचा नियम; फॉर्म-४ न भरल्यास काय होते? वाचा सविस्तर.
PPF Form 4 online submission - PPF maturity rules after 15 years
तुमचंही पीपीएफ खातं आहे का? १५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी ही महत्त्वाची गोष्ट माहीत असायलाच हवी!
Published on: 

मुंबई: सार्वजनिक भविष्य निधी (PPF - Public Provident Fund) ही देशातील अत्यंत लोकप्रिय, सुरक्षित आणि दीर्घकालीन बचत योजना मानली जाते. पीपीएफ खात्यामध्ये मिळणारी कर सवलत आणि हमीशीर परतावा यामुळे कोट्यवधी गुंतवणूकदारांचा या योजनेवर विश्वास आहे. मात्र, बऱ्याचदा गुंतवणूकदारांना पीपीएफच्या १५ वर्षांच्या मुदतकालावधीबाबत आणि त्यानंतरच्या नियमांबद्दल संभ्रम असतो. अनेक जण मुदत कधी संपते आणि त्यानंतर पुढे काय करायचे, याबद्दल अनभिज्ञ असतात. पीपीएफ खात्याच्या १५ वर्षांच्या मुदतीचे गणित आणि त्यापुढील प्रक्रियेत 'फॉर्म-४'ची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.

१५ वर्षांची मुदत कधीपासून मोजली जाते?

अनेकांचा असा गैरसमज असतो की, पीपीएफ खात्याची १५ वर्षांची मुदत आपण ज्या महिन्यात किंवा तारखेला पहिली गुंतवणूक केली, त्या दिवसापासून सुरू होते. परंतु, नियमांनुसार पीपीएफ खात्याची १५ वर्षांची मुदत ज्या आर्थिक वर्षात खाते उघडले जाते, त्या आर्थिक वर्षाच्या शेवटापासून मोजली जाते.

उदाहरणार्थ: तुम्ही नोव्हेंबर २०११ मध्ये पीपीएफ खाते उघडले असेल, तर ते २०११-१२ या आर्थिक वर्षात गणले जाईल. अशा परिस्थितीत, १५ वर्षांची मुदत ३१ मार्च २०१२ पासून सुरू होईल आणि तुमचे खाते १ एप्रिल २०२७ रोजी परिपक्व (Mature) होईल. मुदतपूर्तीनंतर पैसे काढल्यास सरकारकडून कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नाही.

PPF Form 4 online submission - PPF maturity rules after 15 years
PPF व्याजदर स्थिर; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांची निराशा

मुदतपूर्तीनंतर पैसे आपोआप लॉक होतात का?

गुंतवणूकदारांना सहसा असा प्रश्न पडतो की, १५ वर्षानंतर पीपीएफ खात्यातून पैसे काढले नाहीत, तर ते पुढील पाच वर्षांसाठी आपोआप लॉक होतात का?

याचे उत्तर 'नाही' असे आहे. खाते आपोआप लॉक होत नाही. जर तुम्हाला तुमचे खाते चालू ठेवायचे असेल आणि त्यात नवीन ठेवी (Deposits) जमा करायच्या असतील, तर एका निश्चित प्रक्रियेचे पालन करणे अनिवार्य आहे. खातेदाराने मुदतपूर्तीच्या तारखेपासून एका वर्षाच्या आत 'फॉर्म-४' (Form-4) सादर करणे आवश्यक असते. काही बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये याला 'फॉर्म-एच' (Form-H) असेही म्हटले जाते. हा फॉर्म भरून दिल्यानंतर खात्याची मुदत आणखी ५ वर्षांच्या टप्प्यांमध्ये हवी तेवढ्या वेळा वाढवता येते. यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.

वर्षभर कोणतीही कारवाई केली नाही, तर काय होते?

जर तुम्ही पीपीएफ खात्याच्या मुदतपूर्तीनंतर एका वर्षाच्या आत 'फॉर्म-४' सादर केला नाही, तर तुमचे खाते बंद केले जात नाही. अशा स्थितीत:

  1. कोणतेही नवीन डिपॉझिट न करता खाते आपोआप सुरू राहील.

  2. खात्यातील शिल्लक रकमेवर सरकारद्वारे निर्धारित केलेला व्याजदर (सध्या ७.१% वार्षिक) मिळत राहील.

  3. मात्र, या स्थितीत तुम्हाला खात्यात कोणतीही नवीन रक्कम जमा करता येणार नाही.

  4. शिवाय, तुम्हाला प्रत्येक आर्थिक वर्षात फक्त एकदाच पैसे काढण्याची परवानगी असेल.

हा फॉर्म बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येतो किंवा संबंधित बँक शाखा आणि पोस्ट ऑफिसमधून सहज मिळवता येतो.

मुदतपूर्तीनंतर खातेदारांकडे असतात हे ३ पर्याय

पीपीएफ ही ईईई (EEE - Exempt, Exempt, Exempt) श्रेणीतील योजना असल्यामुळे गुंतवणूक, त्यावर मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीनंतर हातात येणारी संपूर्ण रक्कम करमुक्त असते. १५ वर्षांचा काळ पूर्ण झाल्यावर खातेदारासमोर प्रामुख्याने तीन पर्याय उपलब्ध असतात:

  1. खाते बंद करून सर्व rakkam काढणे: खाते पूर्णपणे बंद करून आपले मूळ मुद्दल आणि त्यावर जमा झालेले संपूर्ण व्याज एकत्र काढून घेणे.

  2. कोणतीही नवीन ठेव न ठेवता खाते चालू ठेवणे: फॉर्म न भरता खाते तसेच सुरू ठेवणे. यात खात्यातील पैशांवर व्याज मिळत राहील आणि वर्षातून एकदा पैसे काढता येतील, पण नवीन गुंतवणूक करता येणार नाही.

  3. फॉर्म-४ सादर करून मुदत वाढवणे: फॉर्म-४ किंवा फॉर्म-एच सादर करून ५ वर्षांच्या ब्लॉक कालावधीसाठी नवीन निधीसह खात्याची मुदत वाढवणे.

जर तुम्हाला १५ वर्षांनंतरही पीपीएफ खात्याचा लाभ घेत राहायचा असेल आणि नवीन गुंतवणूक सुरू ठेवायची असेल, तर मुदत संपण्याच्या आत फॉर्म-४ वेळेत सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमचे खाते अखंडितपणे चालू राहते आणि चांगल्या परताव्याचा लाभ मिळत राहतो.

Banco News
www.banco.news