तुमचे पॅन कार्ड सुरक्षित आहे का? 'अशी' करा मिनिटांत तपासणी!

पॅन कार्डचा गैरवापर आढळल्यास घाबरू नका; '१९३०' सह 'या' ठिकाणी करा तातडीने तक्रार
तुमचे पॅन कार्ड सुरक्षित आहे का? 'अशी' करा मिनिटांत तपासणी!
Published on

वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तयार केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये 'पॅन कार्ड' (PAN Card) हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. केवळ आयकर भरण्यासाठीच नव्हे, तर बँक खाते उघडण्यापासून ते मोठ्या आर्थिक व्यवहारांपर्यंत सर्वत्र पॅन कार्डचा वापर अनिवार्य आहे. मात्र, अलीकडच्या काळात पॅन कार्डच्या आधारे नागरिकांच्या नकळत बनावट कंपन्या स्थापन करणे, जीएसटी (GST) नंबर मिळवणे आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करण्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत.

मागील तीन वर्षांत संशयास्पद पद्धतीने परदेशात पाठवण्यात आलेल्या पैशांची आयकर विभागाने देशव्यापी चौकशी सुरू केली आहे. ज्या कंपन्या आणि संस्थांचे परदेशातील व्यवहार त्यांच्या मूळ उत्पन्नाशी जुळत नाहीत, अशा संस्थांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या पॅन कार्डवर कुणी भलत्याच व्यक्तीने बनावट कंपनी किंवा व्यवसाय तर सुरू केला नाही ना, हे तपासणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

तुमचे पॅन कार्ड सुरक्षित आहे का? 'अशी' करा मिनिटांत तपासणी!
तुमचे आधार-पॅन वापरून कुणी उघडले नाही ना खाते?

तुमच्या पॅन कार्डवर GST नोंदणी आहे का? 'अशी' करा ऑनलाईन तपासणी

तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाला आहे का, हे शोधण्यासाठी पुढील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

  • GST पोर्टलवर जा: अधिकृत जीएसटी पोर्टलवर जाऊन 'Services' विभागात 'Search Taxpayer' हा पर्याय निवडा.

  • Search by PAN: 'Search by PAN' वर क्लिक करून तुमचा पॅन नंबर आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

  • माहितीची पडताळणी: स्क्रीनवर तुमच्या पॅनशी जोडलेली सर्व जीएसटी नोंदणीची माहिती दिसेल. जर त्यात तुमच्याशी संबंधित नसलेल्या कंपनीचे नाव दिसत असेल, तर तुमच्या पॅनचा गैरवापर झाल्याची शक्यता असते.

Form 26AS आणि AIS द्वारे तपासा आर्थिक व्यवहार

  • Income Tax e-Filing Portal वर लॉगिन करा.

  • 'e-File' विभागात जाऊन Form 26AS आणि Annual Information Statement (AIS) उघडा.

  • येथे तुमचे आर्थिक व्यवहार, जमा झालेला कर आणि उत्पन्न तपासा. कोणताही अनोळखी किंवा संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित नोंद घ्या.

फसवणूक झाली असल्यास तात्काळ करा 'या' उपाययोजना

तपासणीदरम्यान तुमच्या पॅनवर बनावट जीएसटी नोंदणी, अनोळखी कर्ज किंवा संशयास्पद कंपनी जोडलेली आढळल्यास खालील पावले त्वरित उचला:

  • सायबर हेल्पलाइन: राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल (National Cyber Crime Reporting Portal) वर ऑनलाइन तक्रार नोंदवा किंवा १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.

  • GST हेल्पडेस्क: बनावट जीएसटी नोंदणी आढळल्यास जीएसटी पोर्टलच्या अधिकृत हेल्पडेस्ककडे त्वरित तक्रार दाखल करा.

  • पोलीस तक्रार: प्रकरण गंभीर असल्यास आणि मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर (FIR) नोंदवा.

तुमचे पॅन कार्ड सुरक्षित आहे का? 'अशी' करा मिनिटांत तपासणी!
सावधान! दोन पॅन कार्ड म्हणजे कायदेशीर १०,००० रुपयांचा दंड

पुरावे आणि स्क्रीनशॉट जतन करून ठेवा

तक्रार दाखल करताना संशयास्पद जीएसटी नोंदणी, बनावट व्यवहार आणि विसंगत नोंदींचे सर्व स्क्रीनशॉट्स व संबंधित कागदपत्रे पुराव्यादाखल सुरक्षित ठेवा. हे पुरावे पुढील कायदेशीर आणि पोलिसांच्या चौकशीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.

Banco News
www.banco.news