तुमच्या खिशातील 'हे' कार्ड ठरणार 'सायलेंट किलर'; एका चुकीमुळे थेट आयकर विभागाचा वॉरंट?

ऑनलाईन व्यवहारांमागील 'ते' धक्कादायक सत्य, जे ९०% लोकांना अजूनही माहीत नाही!
income tax notice for credit card
सावधान! तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड दुसऱ्याला दिलंय? आयकर विभागाची 'गुपचूप' नजर!
Published on

आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड ही आपली दैनंदिन गरज बनली आहे. आकर्षक कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स किंवा नो-कॉस्ट ईएमआय (No-Cost EMI) यांसारख्या ऑफर्समुळे क्रेडिट कार्डचा वापर कमालीचा वाढला आहे. अनेकदा आपण मित्र किंवा नातेवाईकांना मोठ्या खरेदीसाठी किंवा ऑनलाईन शॉपिंगसाठी आपले क्रेडिट कार्ड हसत-मुखानं वापरू देतो. यामागे अधिक रिवॉर्ड पॉइंट्स मिळवणे किंवा जवळच्या व्यक्तीला मदत करणे हाच उद्देश असतो. परंतु, तुमची हीच 'मदत' तुम्हाला थेट आयकर विभागाच्या (Income Tax Department) कचाट्यात पकडू शकते, हे तुम्हाला माहित आहे का?

होय, जर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड इतरांसोबत शेअर करत असाल, तर आताच सावध व्हा. तुमच्या या सवयीमुळे तुमच्या बँक खात्यावर आणि व्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर पडू शकते आणि तुम्हाला थेट नोटीस बजावली जाऊ शकते.

क्रेडिट कार्ड शेअर करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे - कार्ड कोणाच्याही हातात असले, तरी त्याचा कायदेशीर मालक हा कार्डधारकच असतो.

तुमचा मित्र किंवा नातेवाईक तुमच्या कार्डवरून लाखो रुपयांची खरेदी करत असेल, तरीही तो सर्व खर्च सरकारी दप्तरात तुमच्याच नावावर नोंदवला जातो. जेव्हा आर्थिक वर्षाच्या शेवटी आयकर विभाग तुमच्या घोषित उत्पन्नाची (Declared Income) आणि क्रेडिट कार्डवरील खर्चाची जुळवणी करतो, तेव्हा तिथे मोठी तफावत दिसून येऊ शकते. तुमचे उत्पन्न कमी आणि कार्डवरील खर्च अवाजवी असेल, तर कर विभागाला संशय येणे स्वाभाविक आहे. यातूनच कर चोरीचा संशय बळावतो आणि चौकशीची नोटीस पाठवली जाते.

income tax notice for credit card
क्रेडिट कार्डची ड्यू डेट चुकली? काळजी नको वाचा रिझर्व्ह बँकेचा नवा नियम

AIS आणि Form 26AS: तुमच्या प्रत्येक व्यवहाराचा 'कुंडली'

अनेकांना असे वाटते की क्रेडिट कार्डचे बिल भरले की विषय संपला. पण तसे नाही. आयकर विभाग तुमच्या प्रत्येक मोठ्या व्यवहारावर दोन मुख्य साधनांद्वारे बारीक लक्ष ठेवून असतो:

  1. AIS (Annual Information Statement)

  2. Form 26AS

बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या वर्षातील सर्व मोठ्या व्यवहारांची (उदा. एका वर्षात क्रेडिट कार्डचे १ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख बिल भरणे किंवा १० लाख रुपयांपेक्षा जास्त एकूण पेमेंट करणे) माहिती थेट सरकारला देतात. तुम्ही जेव्हा आयटीआर (ITR) फाईल करता, तेव्हा या व्यवहारांची पडताळणी केली जाते. खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ न बसल्यास प्रकरणाची छाननी (Scrutiny) सुरू होते.

जेव्हा तुमचे मित्र तुमच्या कार्डवरून खरेदी करतात, तेव्हा ते त्याचे पैसे तुम्हाला रोख स्वरूपात किंवा बँक ट्रान्सफरद्वारे परत करतात. जर ही रक्कम मोठी असेल आणि तुम्ही त्याचा योग्य हिशोब देऊ शकला नाहीत, तर आयकर विभाग या रकमेला तुमचे 'अघोषित उत्पन्न' मानू शकतो. अशा परिस्थितीत, मूळ करासोबतच अवाढव्य दंडही भरावा लागू शकतो. विशेषतः महागड्या वस्तूंची खरेदी, व्यावसायिक व्यवहार किंवा वारंवार होणारे मोठे व्यवहार विभागाच्या रडारवर असतात.

income tax notice for credit card
भारताचे पहिले 'LED' क्रेडिट कार्ड लाँच! जाणून घ्या काय आहे खास.

नोटीस आणि आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी 'हे' करा:

जर तुम्ही व्यावसायिक कारणांसाठी किंवा ऑफिसच्या कामासाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर प्रत्येक बिलाची आणि खर्चाची अचूक नोंद ठेवणे अत्यंत बंधनकारक आहे. याशिवाय भविष्यातील अडचण टाळण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्या:

  • कागदपत्रे सुरक्षित ठेवा: जर मित्रांनी किंवा कुटुंबियांनी तुमच्या कार्डवरून खरेदी केली असेल आणि त्याचे पैसे बँक ट्रान्सफर, भेटवस्तू किंवा इतर मार्गाने तुम्हाला दिले असतील, तर त्या सर्व व्यवहारांचे पुरावे/स्टेटमेंट्स सांभाळून ठेवा.

  • नियमित तपासणी करा: करदात्यांनी वेळोवेळी आपले AIS, TIS आणि Form 26AS तपासत राहिले पाहिजे, जेणेकरून तिथे कोणतीही चुकीची नोंद दिसत नाही ना, याची खात्री करता येईल.

  • अचूक ITR फाईल करा: आपला आयकर परतावा (ITR) भरताना कोणतीही माहिती लपवू नका. सर्व उत्पन्न आणि खर्चाची अचूक माहिती द्या.

  • अनावश्यक व्यवहार टाळा: सर्वात सोपा उपाय म्हणजे, स्वतःच्या उत्पन्नाच्या मर्यादेबाहेर जाऊन इतरांसाठी क्रेडिट कार्डवरून मोठे व्यवहार करणे पूर्णपणे टाळा.

नातेसंबंध जपणे किंवा मित्राला मदत करणे योग्यच आहे, पण डिजिटल युगात आर्थिक व्यवहार करताना नियमांचे भान ठेवणे तितकेच गरजेचे आहे. अन्यथा, मित्राला दिलेले क्रेडिट कार्ड तुम्हाला भविष्यात फार महाग पडू शकते!

Banco News
www.banco.news