PF बॅलन्सपासून ते UPI द्वारे पैसे काढण्यापर्यंत... जाणून घ्या नवीन फीचर्स!

ईपीएफओचे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल सुरू; कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना थेट मोबाईलवर मिळणार अपडेट्स
EPFO WhatsApp Service - EPFO Official WhatsApp Channel Link
UAN लिंक असलेल्या नंबरवरून करा मेसेज; QR कोड आणि लिंकद्वारे चॅनलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
Published on

मुंबई: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल सेवांचा विस्तार करत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ईपीएफओने आपले अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल सुरू केले असून, आता सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्याशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि माहिती थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत ईपीएफओने या नव्या सेवेची अधिकृत घोषणा केली.

ईपीएफओच्या या नव्या सेवेमुळे पीएफ बॅलन्स तपासणे आणि खात्याची माहिती मिळवणे अत्यंत सोपे झाले आहे. सदस्यांना ईपीएफओच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर फक्त ‘Hello’ असा मेसेज पाठवावा लागेल.

  • प्रक्रिया कशी असेल?

    १. मेसेज पाठवल्यानंतर ईपीएफओची सिस्टीम वापरकर्त्याची ओळख आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी (UAN) लिंक असलेला मोबाईल नंबर आपोआप सत्यापित (Verify) करेल.

    २. पडताळणी यशस्वी झाल्यानंतर स्क्रीनवर एक सेवा मेनू (Menu) दिसेल.

    ३. या मेनूमधून सदस्य आपल्या गरजेनुसार पीएफ बॅलन्स, जमा झालेली रक्कम आणि इतर अपडेट्स एका क्लिकवर पाहू शकतील.

EPFO WhatsApp Service - EPFO Official WhatsApp Channel Link
निवृत्तीनंतर PF खात्यावर व्याज कधी थांबते? EPFO चा मोठा खुलासा

असे व्हा व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी

आपल्या सेवांचा विस्तार जास्तीत जास्त कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ईपीएफओने व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी ईपीएफओने एक QR कोड आणि अधिकृत लिंक प्रसिद्ध केली आहे:

  • QR कोड: ईपीएफओने एक्स-पोस्टवर शेअर केलेला QR कोड स्कॅन करून थेट चॅनलशी जोडले जाऊ शकते.

  • थेट लिंक: सदस्य https://whatsapp.com/channel/0029Vb6kmH48Pgs8ftd6Kw3Y या अधिकृत लिंकवर क्लिक करूनही व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सामील होऊ शकतात.

लवकरच UPI द्वारे पीएफचे पैसे काढता येणार

खात्याची माहिती सोप्या पद्धतीने देण्यासोबतच ईपीएफओ पैसे काढण्याची प्रक्रियाही अधिक सुलभ करत आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सदस्यांना यूपीआय (UPI) द्वारे पीएफ खात्यातील रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्याची सुविधा मिळणार आहे. या सेवेची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असून, लवकरच ही UPI पेमेंट गेटवे सुविधा सर्व सदस्यांसाठी पूर्णपणे सुरू करण्यात येणार आहे.

ईपीएफओच्या या डिजिटल उपक्रमांमुळे कागदपत्रांचा खटला आणि कार्यालयांच्या फेऱ्या मारण्यापासून कर्मचाऱ्यांची सुटका होणार असून, पारदर्शकता आणि सुलभता वाढण्यास मदत होईल.

Banco News
www.banco.news