वीरशैव पतसंस्थेच्या चेअरमनपदी संगम डोंबे, तर व्हा.चेअरमनपदी सौ. शोभा डिगोळे!

उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात बिनविरोध निवड; सभासदांचा विश्वास जपण्याची नूतन पदाधिकाऱ्यांची ग्वाही.
Veershaiv Pat Sanstha Atpadi
चेअरमनपदी संगम डोंबे, तर व्हाईस चेअरमनपदी शोभा डिगोळे यांची बिनविरोध निवड
Published on

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील अग्रगण्य असणाऱ्या 'वीरशैव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, आटपाडी'च्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया नुकतीच संस्था कार्यालयात उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडली. यामध्ये संस्थेच्या चेअरमनपदी संगम बबन डोंबे यांची, तर व्हाईस चेअरमनपदी सौ. शोभा विजय डिगोळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान अध्यासी अधिकारी म्हणून श्रीमती सुषमा शिंदे यांनी काम पाहिले. त्यांना एम. बी. कुलकर्णी यांनी सहकार्य केले. सर्व नियमांचे तंतोतंत पालन करत ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले.

Veershaiv Pat Sanstha Atpadi
वीरशैव ग्रामीण पतसंस्थेचा विश्वासार्ह ३५ वर्षांचा प्रवास; सभासदांना १०% लाभांश!

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना संस्थेची प्रगती अधिक उंचावणे, सभासदांचा विश्वास वृद्धिंगत करणे आणि आर्थिक शिस्त जपून संस्थेच्या विकासाला नवी दिशा देणे हाच मुख्य ध्येय राहील, असा विश्वास नूतन चेअरमन संगम डोंबे यांनी व्यक्त केला.

Veershaiv Pat Sanstha Atpadi
आटपाडीत संचालक व कर्मचाऱ्यांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन.

या प्रसंगी माजी चेअरमन अजित भिंगे, माजी व्हाईस चेअरमन सौ. शिल्पा हेकणे यांच्यासह संचालक भारत आप्पा जवळे, दिलीप लिगाडे, ॲड. केदारनाथ भिंगे, राहुल घोंगडे, अमोल राजमाने, दत्तात्रय माने आणि अनिल रूपटक्के उपस्थित होते. तसेच संस्थेच्या व्यवस्थापक सौ. वृषाली कुंभार व सर्व कर्मचारी वृंदाने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Banco News
www.banco.news