वीरशैव ग्रामीण पतसंस्थेचा विश्वासार्ह ३५ वर्षांचा प्रवास; सभासदांना १०% लाभांश!

आटपाडीत वीरशैव ग्रामीण पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाच्या यशस्वी कारभाराची पावती.
Veershaiv Pat Sanstha Atpadi - Pat Sanstha News Maharashtra
आटपाडीत वीरशैव ग्रामीण पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सभा उत्साहात
Published on

आटपाडी : वीरशैव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, आटपाडीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहपूर्ण, सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेने वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. अजित भिंगे होते. सभेच्या प्रारंभी श्री.ॲड. केदारनाथ भिंगे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, संचालक, सभासद व ठेवीदारांचे शब्दसुमनानी स्वागत केले.

अध्यक्षीय भाषणात आणि कामकाजाचा आढावा मांडताना चेअरमन श्री. अजित भिंगे म्हणाले की, "सभासद आणि ठेवीदारांचा संस्थेवर असणारा अखंड विश्वास हीच वीरशैव पतसंस्थेची खरी ताकद आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या काळातही संस्थेने शिस्तबद्ध कारभार, पारदर्शकता आणि प्रभावी वसुलीच्या जोरावर भक्कम प्रगती साधली आहे."

त्यांनी संस्थेचा वार्षिक आर्थिक लेखाजोखा खालीलप्रमाणे सादर केला:

  • एकूण ठेवी: मार्चअखेर ₹२४ कोटी २५ लाख

  • कर्जवाटप: गरजूंना व व्यावसायिकांना ₹२२ कोटी ५६ लाख

  • भागभांडवल: ₹२ कोटी ३२ लाख

  • गुंतवणूक: सुरक्षेच्या दृष्टीने ₹६ कोटी ५६ लाख

  • निव्वळ नफा: ₹६३ लाख ९४ हजार

  • लाभांश: सभासदांसाठी १० टक्के लाभांश घोषित

सभेत संस्थेचे माजी चेअरमन श्री. सतिश भिंगे यांनी संस्थेच्या वाढत्या आलेखाबद्दल संचालक मंडळ, कर्मचारी व व्यवस्थापनाचे विशेष अभिनंदन केले. संस्थेच्या भविष्यातील विस्तारासाठी त्यांनी काही नवीन योजना मांडल्या. ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी आणि संचालक मंडळ या सर्वांच्या एकत्रित योगदानामुळेच संस्था आज ३५ वर्षांचा यशस्वी टप्पा गाठू शकली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभेदरम्यान सभासदांनी विविध विकासात्मक सूचना मांडल्या. या सर्व सूचनांवर संस्थेच्या व्यवस्थापक सौ. वृषाली कुंभार व पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Veershaisha Pat Sanstha Atpadi hosted its 35th AGM
"आपली संस्था, आपला विश्वास!"

या वार्षिक सभेला व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री. अजयकुमार दादा भिंगे, ज्येष्ठ सभासद आर. बी. देशमुख सर, विलास राजमाने, दिलीप ढेरे सर, शिवाजी माळी साहेब, दिनेश भिंगे सर, अजितकुमार भिंगे, प्रदीप देशमुख, भारत सागर, नगरसेवक महेश देशमुख, भारत डिगोळे सर, बसवेश्वर बुरजे, प्रसाद दिक्षित, लक्ष्मणराव चोथे, राहुल हेकणे, इलियास इनामदार, दिनेश देशमुख, राजेन्द्र क्षिरसागर, प्रसाद भिंगे, दत्तात्रेय स्वामी, कैलास भिंगे, शशिकांत पाठक गुरुजी, विजय राजमाने, विजय नष्टे, देवेश भिंगे, प्रवीण भिंगे, विकास भूते सर उपस्थित होते.

तसेच ज्येष्ठ संचालक श्री. भारत आप्पा जवळे, श्री. दिलीप काका लिगाडे, नगरसेवक श्री. संगम डोंबे, श्री. राहुल घोंगडे, श्री. मिलिंद होनराव, श्री. महेश चांडवले, श्री. दत्तात्रेय माने, श्री. अनिल रूपटक्के, सौ. शोभा डिगोळे, सौ. शिल्पा हेकणे यांच्यासह संचालक मंडळ, आजी-माजी पदाधिकारी, सभासद व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या ३५ वर्षांत संस्थेने “आपली संस्था • आपली प्रगती • आपला विश्वास” या ब्रीदवाक्याला जागून कार्य केले आहे. भविष्यातही पतसंस्थेला अधिक सक्षम, डिजिटल आणि प्रगतिपथावर नेण्यासाठी सर्वांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सभेच्या शेवटी संचालक श्री. अमोल राजमाने यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्याने ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत समाधानकारक वातावरणात पार पडली.

Banco News
www.banco.news