श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेची २५ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न!

चिंबळी फाटा, सोमाटणे, चऱ्होली आणि नाणेकरवाडी शाखा ठरल्या 'उत्कृष्ट शाखा'; मोशीत सभा उत्साहात संपन्न.
Shri Samarth Nagari Sahakari Patsanstha - श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था चिंबळी फाटा
संस्थापक संभाजीशेठ गवारी व शिवाजीराव गवारी यांच्या मार्गदर्शनात पार पडला दिमाखदार सोहळा.
Published on

चिंबळी फाटा : श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिंबळी फाटा या संस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोशी येथील 'हॉटेल मोशी इंपिरियल' येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या सभेत सभासदांसाठी ११ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सभेच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे प्राध्यापक श्री. विलास लिंबळे यांनी उपस्थितांना सहकार कायदा व सहकारी संस्थांच्या कामकाजाबाबत सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.

वार्षिक अहवाल व ११% लाभांश मंजूर

सभेत आर्थिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक आणि ताळेबंद पत्रकास सर्व सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली, ज्याचे सर्व सभासदांनी स्वागत केले. याशिवाय सेवक कल्याण निधी आणि सभासद कल्याण निधीच्या नियमावलीसही मंजुरी देण्यात आली.

Shri Samarth Nagari Sahakari Patsanstha - श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था चिंबळी फाटा
सहकार क्षेत्रात नव्या भरारीसाठी श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था सज्ज

वार्षिक सभेचे औचित्य साधून खेड तालुक्यातील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी बजावलेल्या नागरिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या चिंबळी फाटा, सोमाटणे, चऱ्होली आणि नाणेकरवाडी या शाखांना 'उत्कृष्ट शाखा' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • गुणवंत कर्मचारी: दिशा मुऱ्हे, आदित्य गवारे, सौरभ बोत्रे, प्रियांका येळवंडे, तुषार ठाकुर, सनी शिंदे, आम्रपाली बवले आणि संतोष डांगे.

  • उत्कृष्ट शाखा विकासक: दिनेश सरोदे.

संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ श्री. संभाजीशेठ गवारी व संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव गवारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या यशस्वी २५ वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकला. या प्रसंगी पतसंस्था व मल्टिस्टेटच्या सर्व शाखांचे संचालक, सल्लागार मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेचे प्रास्ताविक व कामकाजाचे नियोजन संस्थेचे सीईओ श्री. अमोल गवारे, श्री. अर्जुन जाधव आणि श्री. प्रज्वल लेंडघर यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. किसन देशमुख व श्री. प्रदीप लांडगे यांनी केले. सामूहिक पसायदानाने सभेची यशस्वी सांगता झाली.

Banco News
www.banco.news