
चिंबळी फाटा येथील श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिंबळी फाटा या संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सिझन बँक्वेट हॉल, मोशी, ता. हवेली, जि. पुणे येथे अत्यंत उत्साहात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.शिवाजीराव गवारी तर प्रमुख उपस्थिती संस्थेचे संस्थापक श्री. संभाजीशेठ गवारी, उपाध्यक्षा सौ. सुरेखाताई गवारी, खजिनदार श्री. संतोषशेठ गवारी, सर्व शाखांचे संचालक व सल्लागार मंडळ उपस्थित होते. संस्थेचे हे रौप्य महोत्सव वर्ष असून या सभेत मोठ्या प्रमाणात सभासदांनी सहभाग घेतला होता. या वेळी प्रा. विलास लिंबळे यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले.
सभेचे कामकाज सीईओ श्री. अमोल गवारे, संतोष साकोरे, प्रज्वल लेंडघर, गोविंद गवारे यांनी पाहिले तर सूत्रसंचालन आदेश टोपे यांनी केले. सभेत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करुन एकमताने मंजुरी देण्यात आली. या वर्षी सभासदांना आज पर्यंतचा सर्वात जास्त ११% एवढा विक्रमी लाभांश घोषित करण्यात आला.
सभेचे औचित्य साधून संस्था कार्यक्षेत्रातील विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे संस्थेचे गुणवंत कर्मचारी, दैनंदिन ठेव प्रतिनिधी व उत्कृष्ट शाखांचा सत्कार करण्यात आला. श्री समर्थ ग्रुपमध्ये नव्याने समाविष्ट झालेले श्री समर्थ वार्ता साप्ताहिक वृत्तपत्राचे सर्व संचालक सल्लागार मंडळ व सभासद यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे सल्लागार हनुमंत कातोरे यांनी सर्वांचे आभार मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.