लाईफ लाईन महिला पतसंस्था नागपूरची वार्षिक सभा संपन्न

अल्पावधीत सभासदांना १०% लाभांश देण्याचा विक्रम
लाईफ लाईन महिला पतसंस्था
श्री.राजेंद्र घाटे व सहकार तज्ञ मा.सहकार परिषद अध्यक्ष राज्य मंत्री दर्जा श्री.शेखर चरेगावकर व उपस्थित मान्यवर
Published on

नागपूर येथील लाईफ लाईन महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूरची ४ थी वार्षिक आमसभा नुकतीच गुजर सेलिब्रेशन रिंग रोड नागपूर येथे उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.आश्लेषा मदनकर होत्या. यावेळी नागपूर जिल्हा पत व कर्मचारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र घाटे व सहकार तज्ज्ञ मा. सहकार परिषद अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री.शेखर चरेगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेस सुरुवात झाली. प्रथम आर्थिक वर्षात दिवंगत झालेले सभासद, शेतकरी, खातेधारक, हितचिंतक व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

लाईफ लाईन महिला पतसंस्था
नागपूरच्या शिक्षक सहकारी बँकेची सभा उत्साहात संपन्न

विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापकीय संचालक डॉ. नागेश्वर मदनकर यांनी केले. सर्व सोळा विषयांना सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आश्लेषा मदनकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. या आर्थिक वर्षात संस्थेने ३० कोटीचा व्यवसाय केला असून तब्बल २४.१९ लक्ष रुपये नफा कमविला आहे. संस्थेने यंदाही ऑडिट वर्ग ”अ” कायम ठवलेला आहे. सभासदांना अल्पावधीत १०% लाभांश देत एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. लाईफ लाईन महिला संस्थेने आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले असून ग्राहकाना मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वप्रकारच्या बँकिंग सेवा दिल्या जात आहेत.

लाईफ लाईन महिला पतसंस्था
सभासद १० वी व १२ चे परीक्षेत ७५ टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन पास झालेले विध्यार्थी व पाल्याचा भेट वस्तू देऊन सत्कार करताना

उद्योजकांना व्यावसायिक भरभराटीसाठी QR कोड तसेच बचत ठेव खात्यावर ६% व्याज दिले जात आहे. कॉल डीपॉझिटवर १५ दिवसांचे वर ८% वार्षिक व्याज देण्यात येते. संस्थेने वन टाईम लाइफ टाईम १०% , SIP & SWP योजना अंतर्गत किमान २००० दरमहा जमा केल्यास २८ वर्षात रु.२५,१३,७७७/- व लाइफ लाईन आयुष्यमान योजनेअंतर्गत दरमहा ९६ रक्कम जमा केल्यास तेवढीच रक्कम आयुष्यभर व नंतर त्याच्या वारसांना आजीवन परतावा देण्याची योजना आहे. ५ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ५०१ वृक्षांची लागवड केली. तसेच सभास्थळी ५१ सभासदांनी रक्तदान केले.

लाईफ लाईन महिला पतसंस्था
जनता सहकारी बँक धाराशिवमध्ये "मोबाईल बँकिंग"चा शुभारंभ

श्री. शेखरजी चरेगावकर यांनी संस्थेचे सभासद, संचालक, आधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांना प्रशिक्षण दिले व संस्थेच्या कार्याची विस्तृत माहिती देऊन संस्थेच्या महिला प्रतिनिधीनी अवघ्या चार वर्षात केलेल्या प्रगतीची प्रशंसा केली. सभेत नागपूर जिल्हा पत व कर्मचारी पत संस्था संघाचे अध्यक्ष राजेंद्रजी घाटे, सेवाश्री पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. मंगेशजी सातपुते, सुभाषजी घाटे, योगाचार्य संजयजी कटकामवार, संस्थेचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Banco News
www.banco.news