श्री बाल हनुमान पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

सभासदांना १५ टक्के लाभांश देणार
श्री बाल हनुमान पतसंस्था
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. अमर समर्थ, व इतर मान्यवर ..
Published on

कोल्हापूर : येथील श्री बाल हनुमान पतसंस्थेची ७८ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष अमर समर्थ सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्री. समर्थ म्हणाले की, "संस्थेस 'अ' वर्ग मिळाला असून, संस्थेच्या ठेवी २० कोटी रुपये आहेत. एन.पी.ए.चे प्रमाण शून्य टक्के आहे. संस्थेस २४,२०,००० रुपये नफा झाला आहे. संस्थेच्या या प्रगतीचे श्रेय " (कै.) प्रणव समर्थ यांना व सर्व सभासद, संचालक आणि कार्यक्षमकर्मचारी यांना आहे.

श्री बाल हनुमान पतसंस्था
गोकुळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

यावेळी दिवंगत संचालक नारायण कुरणे, अन्य दिवंगत मान्यवरांना संचालिका सौ. सुनंदा जाधव यांनी श्रद्धांजली वाहिली. संचालक संभाजी आरेकर, सीईओ प्रिया चरणे यांनी मनोगत व्यक्त केले. सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार आहे, असे संचालक दिनकर बावडेकर यांनी सांगितले. सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री बाल हनुमान पतसंस्था
कॉसमॉस बँकेची ११९ वी वार्षिक सभा उत्साहात
Banco News
www.banco.news