पन्हाळा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

सभासदांना १३ टक्के लाभांश देण्याची घोषणा

पन्हाळा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्था
पन्हाळा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्था
Published on

कोडोली येथील पन्हाळा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सभा नुकतीच खेळमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत संस्थाध्यक्ष ज्ञानदेव पाटील यांनी संस्थेस १५ लाखांहून अधिक नफा झाल्याचे सांगून सभासदांना १३ टक्के लाभांश देण्याची व सभासदांच्या पाल्याच्या विवाहाप्रसंगी १५०० रु. शुभेच्छा भेट, मृत सभासद कर्जमुक्ती योजनेत ५ लाख रुपयांची वाढ केल्याची घोषणा केली.

कोडोली हौसिंग सोसायटीच्या सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी जय ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण काळे होते. यावेळी ज्ञानदेव पाटील म्हणाले, 'मार्च २०२५ अखेर संस्थेच्या सहा कोटी तेरा लाखांच्या ठेवी व एक कोटी ६५ लाख निधी असून, सात कोटी ६५ लाख कर्जवाटप केले आहे. दोन कोटी चार लाखांची गुंतवणूक आहे. यातून १५ लाखांवर नफा झाला. संस्थेला 'अ' ऑडिट वर्ग मिळाला.'


पन्हाळा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्था
यशवंत सहकारी बँक कुडित्रेची वार्षिक सभा खेळीमेळीत

यावेळी निवृत्त सभासद, गुणवंत पाल्य, नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार झाला. सभासदांच्या प्रश्नांचे निराकरण संचालक मनोहर पाटील यांनी केले. अहवालवाचन व्यवस्थापक संगीता तोडकर यांनी केले. यावेळी संचालक लालासाहेब पाटील, वामन पाटील, जीवन पाटील, तानाजी चौगुले, जयवंत पाटील, अण्णा पाटील, फत्तेसिंग पाटील, विकास समुद्रे, पोपट पाटील, मारुती तुराई, पंडित साळोखे, तानाजी जमदाडे, राजाराम पाटील, भिकाजी जाधव, वनिता माने, पद्मिनी बोरगे उपस्थित होते. सचिन फल्ले यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष विनोद शिंगे यांनी आभार मानले.

Banco News
www.banco.news