
लातूर: येथील मांजरा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूर (संस्कार वर्धिनी शाखेसमोर, बार्शी रोड) यांच्याकडून खालीलप्रमाणे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. संस्थेकडे आधुनिक बँकिंग सुविधा, IFSC कोड, कोअर बँकिंग, मोबाइल बँकिंग, NEFT, RTGS आदी सेवा उपलब्ध आहेत.
उपलब्ध पदे, पदसंख्या व शैक्षणिक पात्रता:
• मुख्य कार्यकारी अधिकारी – १ पद : M.Com., B.Com., GDC&A, बँकिंग क्षेत्रातील किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक
• शाखाधिकारी – ३ पदे : M.Com., B.Com., बँकिंग क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव
• अकाउंटंट – ३ पदे : M.Com., B.Com., बँकिंग क्षेत्रातील किमान २ वर्षांचा अनुभव
• कॅशियर/क्लार्क – ६ पदे : M.Com., B.Com., बँकिंग क्षेत्रातील किमान २ वर्षांचा अनुभव व संगणकीय ज्ञान असणे आवश्यक
• वसुली अधिकारी – २ पदे : कोणत्याही शाखेचा पदवीधर, अनुभव असणे आवश्यक
• पिग्मी एजंट – ६ पदे : दहावी उत्तीर्ण
• सेवक – २ पदे : बारावी उत्तीर्ण, अनुभव असणे आवश्यक
मुलाखत तपशील:
दिनांक: १० सप्टेंबर २०२५, बुधवार, सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत
ठिकाण : मांजरा महिला अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., लातूर
उमेदवारांनी आपला बायोडाटा व आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.