लातूर अर्बन को-ऑप बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नवनीत भंडारी

सहकार मूल्यांचा सन्मान राखणे हेच ध्येय
श्री.नवनीत भंडारी
लातूर अर्बन को-ऑप बँकश्री.नवनीत भंडारी
Published on

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) श्री.नवनीत भंडारी यांची नुकतीच लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. या अग्रगण्य नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) पदावर औपचारिक नियुक्ती केली आहे.

वयाच्या केवळ ३५व्या वर्षी या पदावर निवड झाल्यामुळे भंडारी हे देशातील नागरी सहकारी बँक क्षेत्रातील सर्वात तरुण व्यवस्थापकीय संचालकांपैकी एक मानले जात आहेत. लातूर येथे मुख्यालय असलेल्या या बँकेच्या १२ जिल्ह्यांमध्ये २१ शाखा असून, ३१ मार्च २०२५ अखेर एकूण व्यवसाय १,३०७ कोटी इतका आहे.

श्री. प्रदीप राठी यांनी १९९५ मध्ये या बँकेची स्थापन केली. या सहकार क्षेत्रातील दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाने आर्थिक समावेशन आणि शहरी-ग्रामीण भागातील ग्राहकांना सक्षम बँकिंग सेवा देण्याचे ध्येय ठेवून बँकेची वाटचाल सुरू केली.

संस्थापकांचे सुपुत्र, विद्यमान चेअरमन श्री. आकाश राठी हे देखील देशातील सर्वात तरुण बँक अध्यक्षांपैकी एक आहेत. त्यांच्या नेतृत्वासोबत नवनीत भंडारी यांचे तरुण व प्रगतशील व्यवस्थापन बँकेला नव्या उंचीवर नेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नियुक्तीबद्दल बोलताना भंडारी यांनी संचालक मंडळ, शेअरहोल्डर्स आणि ग्राहकांचे आभार मानत सांगितले की, “बँकेची आर्थिक प्रगती, डिजिटल सेवांचा विस्तार आणि ग्राहक संबंध दृढ करताना सहकार मूल्यांचा सन्मान राखणे हेच माझे ध्येय आहे.” लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक स्थापनेपासूनच सातत्याने आपले कार्यक्षेत्र वाढवत असून, नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवा पुरवून शहरी व अर्ध-शहरी समाजाशी बँकेने घट्ट नाते जोडलेले आहे.

Banco News
www.banco.news