लाईफ लाईन महिला पतसंस्था "दीपस्तंभ" पुरस्काराने सन्मानित!

१० ते ५० कोटी ठेवी, महिला गट, नागपूर विभाग सहकारी पतसंस्थांत प्रथम!
लाईफ लाईन महिला पतसंस्था
सहकार तज्ञ मा.श्री.काकासाहेब कोयटे,खासदार मा. श्री.प्रभाकरजी कोरे,खासदार मा.श्री.अण्णासाहेब जोल्ले,आमदार मा.सौ.शशिकला जोल्ले व मा.डॉ.श्री.संजय होसमठ व संचालक डॉ.नागेश्वर मदनकर व उपस्थित मान्यवर
Published on

लाईफ लाईन महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर जिल्हाला नुकतेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे आर्थिक वर्ष सन २०२४- २०२५ मध्ये १० ते ५० कोटी ठेवी महिला गट नागपूर विभागातून उत्कृष्ट कामगिरी बद्दल सहकारी पतसंस्थामध्ये प्रथम क्रमांक दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनद्वारा डेनिसन्स रिसॉर्ट गोकर्ण महाबळेश्वर, कुमटा कर्नाटक येथे आयोजित २ दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमात राज्य फेडरेशनचे अध्यक्ष सहकार तज्ञ मा.श्री. काकासाहेब कोयटे यांच्या शुभहस्ते व कर्नाटकचे खासदार मा. श्री. प्रभाकरजी कोरे, खासदार मा. श्री. अण्णासाहेब जोल्ले, आमदार मा. सौ. शशिकला जोल्ले व मा. डॉ. श्री. संजय होसमठ अध्यक्ष कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार क्षेत्रात अग्रेसर लाईफ लाईन महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर जिल्हाला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेने कमी काळात घेतलेल्या उत्तुंग भरारीचे कौतुक करण्यात आले.

लाईफ लाईन महिला पतसंस्था
लाईफ लाईन महिला पतसंस्था नागपूरची वार्षिक सभा संपन्न

यावेळी दीपस्तंभ पुरस्कार संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नागेश्वर मदनकर यांनी स्वीकारला. त्यांनी संस्थेला मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे खातेदार, सभासद,पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी व अभिकर्ता समस्त संचालक मंडळ यांना दिले. ही संस्था सभासदांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेऊन ठेवींवर सर्वांधिक व्याजदर,कर्जावर अल्प व्याजदर, सामाजिक जबाबदारी पार पाडताना केलेले वृक्षारोपण,रक्तदान शिबिर आणि अनेक महिला भगिनींनी रोजगार उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.

Banco News
www.banco.news