
कोल्हापूर येथील शेतकरी सहकारी संघ सेवकांची सहकारी पतसंस्थेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण उत्साहात पार पडली. सभेत सभापती सदाशिव बेलेकर यांनी २०२४-२५ आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद पत्रके व नफा विभागणी सभासदांसमोर मंजुरीसाठी सादर केली. आर्थिक वर्षात मिळालेल्या नफ्यातून सभासदांना १२.५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे जाहीर केले. संस्थेची १०० टक्के वसुली असून आगामी काळात सभासदाभिमुख काम करण्यास संचालक मंडळ कटिबद्ध आहे. संस्थेने कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता सभासदांच्या ठेवीवर, स्वभांडवलातून सभासदांच्या कर्जविषयक गरजा भागवलेल्या आहेत, अशी माहिती बेलेकर यांनी दिली.
अहवाल वर्षातील भागभांडवल, कर्ज व्यवहार, निधनोत्तर साहाय्य निधी, सभासद कल्याण ठेव, शैक्षणिक पुरस्कार याविषयी सविस्तर माहिती दिली. संचालक देवगोंडा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे प्रमुख उपस्थित होते, त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक साताप्पा टोणपे यांनी मनोगत व्यक्त केले. अक्षय चव्हाण यांनी विषय पत्रिकेतील सर्व विषय आणि नोटीस वाचून दाखविली.
विषय पत्रिकेतील सर्व विषयांना मंजुरी दिली. समिती सदस्य उत्तम देसाई यांनी आभार मानले. सभेस समिती सदस्य दीपक निंबाळकर, पंकज पाटील, सतीश नाईक, संजय निर्मळ, सुहास पाटील, रूक्साना जमादार, रोहित लोखंडे आदी उपस्थित होते.