
कोल्हापूर: येथील पाणीपुरवठा कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कावळा नाका येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन उत्तम जाधव होते. यावेळी गव्हर्मेंट सर्व्हन्टस बँकेचे संचालक शशिकांत तिवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेस मोठ्या संख्यने सभासद उपस्थित होते. यावेळी निवृत्त सभासदांना भेटवस्तू वाटप, सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार आदी उपक्रम उत्साहात पार पडले. पतसंस्थेतर्फे सभासदांना ११ टक्के लाभांश, कायम ठेवीवर नऊ टक्के व्याज व सभासदांना दोन हजार रुपयांचे दीपावली कुपन भेट देण्याचे जाहीर करण्यात आले. सेक्रेटरी ज्ञानदेव खराडे यांनी अहवाल वाचन केले. व्हा.चेअरमन राजेंद्र येळवडे यांनी आभार मानले.