
कोडोली येथील कोडोली नागरी सहकारी पतसंस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. सभेत अध्यक्ष बाजीराव मेनकर यांनी संस्थेस ७८ लाख रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात येणार असून संस्थेस ऑडिट 'अ' वर्ग मिळाल्याचे जाहीर केले. सभेच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील होते. येथील सर्वोदय सोसायटीच्या सभागृहात सभा झाली.
यावेळी श्री. मेनकर म्हणाले, "संस्थेकडे ६२ कोटीच्या ठेवी असून कर्जे ४२.५० कोटी आहेत. थकबाकीबाबत प्रभावी उपाययोजना केल्याने थकबाकी व एनपीएमध्ये घट झालेली आहे. यावेळी अमरसिंह पाटील यांनी मलकापूर व कळे शाखेसाठी स्वःमालकीची जागा खरेदी करून इमारत बांधकाम करण्याचा मानस असल्याचा सांगितले. अहवालवाचन व सूत्रसंचालन संस्थेचे सरव्यवस्थापक शिवाजी पाटील यांनी केले. यावेळी नंदन पाटील, लक्ष्मणराव कुलकर्णी, राहुल पाटील, मानसिंग पाटील, प्रकाश पाटील, सचिन जाधव, माणिक मोरे, माधव पाटील, बाजीराव केकरे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष दिलीप पाटील यांनी आभार मानले.