
घुणकी वाठार येथील गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष सुहास पाटील यांनी पतसंस्थेस ५४ लाख ८३ हजार २५२ रुपयांचा नफा झाला असल्याचे सांगून सभासदांना १२ टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा केली. श्री. पाटील म्हणाले, 'संस्थेच्या ठेवी १५ कोटी १७ लाख ९८ हजार रुपये, कर्जे ८ कोटी ९७ लाख १२ हजार, गुंतवणूक ९ कोटी १० लाख ८८ हजार रुपयांच्या आहेत.'
व्यवस्थापक सुरेखा पाटील यांनी अहवालवाचन केले. उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण, संचालक चिमाजी दबडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक रंगराव शिंदे, विश्वास मस्के, बजरंग लहे, आप्पासाहेब चव्हाण, संदीप माने, प्रकाश माळी, मारुती कुंभार, बाळासाहेब वाकसे, हिराबाई पाटील, सुधा सावंत, तज्ज्ञ संचालक नानासाहेब मस्के, लेखापरीक्षक श्रीकांत चौगुले यांच्यासह सभासद उपस्थित होते. संचालक बजरंग लठ्ठे यांनी आभार मानले.