
कोल्हापूर जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभापती पिंटू ढोले यांनी स्वागत केले. व्यवस्थापक नेताजी जाधव यांनी अहवाल वाचन केले. संस्थेचे सभासद ३९६ असून, भागभांडवल चार कोटी १७ लाख आहे. यावर्षाची संस्थेची उलाढाल २८ कोटी ४५ लाख असून खेळते भांडवल १९ कोटी ५१ लाख आहे. संस्थेस निव्वळ नफा ५२ लाख १४ हजार झाला. सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. २०२४-२५ साठी सभासदांना १०.२५ टक्के लाभांश जाहीर केला. त्यानंतर सेवानिवृत्त सभासदांचा गुणगौरव करून तर दहावी, बारावीच्या विद्यार्थांना रोख बक्षीस, स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
उपसभापती भालचंद्र कोतेकर, शाखा सभापती अनिल कांबळे, संचालक मोहन पाटील, दिलीप आदमापुरे, सतीश केसरकर, धनाजी माने, अमित सुतार, संजय सुतार, कैलास आरगे, मनीषा गायकवाड, दीपाली नेजदार, तज्ज्ञ संचालक कृष्णा पाटील, प्रदीप गावडे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभासदांच्या सर्व प्रश्नांना सभापती आणि संचालकांनी उत्तरे दिली. प्रवीण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक संजय सुतार यांनी आभार मानले.