धनसंपदा महिला क्रेडिट सोसायटीला "दीपस्तंभ" पुरस्कार प्रदान!

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनकडून सहकारातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव!
नसंपदा महिला क्रेडिट सोसायटी
अध्यक्षा मा.श्रीमती निरुपा राठोड,संस्थेच्या सचिव श्रीमती निता माळी,कार्यकारी संचालक श्री.रमेश राठोड,मुख्य शाखाधिकारी श्री.राजेश मुत्त्तेपवार,श्री.प्रफुल्ल राठोड व उपस्थित मान्यवर
Published on

नांदेड: येथील धनसंपदा महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.चा नुकताच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनतर्फे देण्यात येणाऱ्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित "दीपस्तंभ" पुरस्काराने गौरव करण्यात आला. कर्नाटकातील कुमटा याठिकाणी पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार संस्थेला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती निरुपा राठोड, संस्थेच्या सचिव श्रीमती निता माळी, कार्यकारी संचालक श्री. रमेश राठोड, मुख्य शाखाधिकारी श्री. राजेश मुत्त्तेपवार आणि हदगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. प्रफुल्ल राठोड यांनी स्वीकारला.

नसंपदा महिला क्रेडिट सोसायटी
धनसंपदा महिला क्रेडिट सोसायटी नांदेडची वार्षिक सभा उत्साहात

या कार्यक्रमाला प्रभाकर कोरे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष तथा खासदार मा. श्री. प्रभाकर कोरे, श्री. बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक मा. श्री. अण्णासाहेब जोल्ले , श्री. बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संस्थापिका मा. सौ. शशिकला जोल्ले तसेच कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक मा. डॉ. संजय होसमठ यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्थेच्या सहकार क्षेत्रातील भरीव योगदानाबदद्ल छत्रपती संभाजीनगर विभागातून २०२४-२५ या वर्षाचा दीपस्तंभ पुरस्कार "धनसंपदा"ला जाहीर करण्यात आला." आंतरराष्ट्रीय सहकार वर्षातच हा पुरस्कार संस्थेला मिळणे हा केवळ योगायोग नसून आम्ही केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. हा पुरस्कार म्हणजे संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या कष्टाचे फळ आहे. हा पुरस्कार केवळ संस्थेचा नसून सर्व सन्माननीय ठेवीदार, भागधारक, खातेधारकांचा आहे. त्यांच्या वतीने आम्ही हा पुरस्कार स्वीकारतो. त्यांच्या आमच्यावरील अतुट विश्वासामुळेच आम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे, अशी भावना मा. अध्यक्षांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.

Banco News
www.banco.news