ग्रामीण अर्थव्यवस्थेला तंत्रज्ञानाची जोड; उद्योजक घडविण्यात यड्राव बँक आघाडीवर

UPI आणि मोबाईल बँकिंगसह यड्राव बँकेची हायटेक वाटचाल; सर्व विषयांना ३३ व्या वार्षिक सभेत एकमताने मंजुरी.
Rajendra Patil Yadravkar News - Yadrav Co-operative Bank Jaysingpur
जयसिंगपूर : यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सभेत बोलताना आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर. व्यासपीठावर मान्यवर.
Published on

जयसिंगपूर: ग्रामीण भागातील युवकांना भक्कम उद्योग-व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ देणे, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकांना विश्वासार्ह बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणे, या उद्देशाने यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. स्व. शामराव अण्णा पाटील-यड्रावकर यांनी पाहिलेले ग्रामीण भागातून नवउद्योजक घडविण्याचे स्वप्न आज यड्राव बँकेच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होत आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

जयसिंगपूर येथील यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

Ajay Patil Yadravakar
चेअरमन अजय पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

अत्याधुनिक डिजिटल सेवांचा विस्तार

सभेच्या प्रारंभी बँकेचे चेअरमन अजय पाटील-यड्रावकर यांनी प्रास्ताविकात बँकेच्या चौफेर प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. बदलत्या काळाची पावले ओळखून यड्राव बँकेने तंत्रज्ञानाचा स्वीकार केला असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांना अधिक जलद, सुरक्षित व पारदर्शक सेवा देण्यासाठी बँकेने:

  • UPI पेमेंट

  • मोबाईल बँकिंग

  • व्हॉट्सॲप बँकिंग

  • क्यूआर कोड (QR Code)

यांसारख्या अत्याधुनिक डिजिटल सेवा यशस्वीपणे सुरू केल्या असून, ग्राहकांकडून याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यड्राव को ऑप बँक वार्षिक सभा
बँकेच्या नवीन 'यश' बोधचिन्हाचे अनावरण.

सभेची सुरुवात स्व. शामराव अण्णा पाटील-यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या प्रसंगी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्या शुभहस्ते बँकेच्या नवीन 'यश' या बोधचिन्हाचे (Logo) उत्साहात अनावरण करण्यात आले. हे नवीन बोधचिन्ह बँकेच्या पुढील प्रगतीचे व आधुनिकतेचे प्रतीक ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांवर सखोल चर्चा होऊन, उपस्थित सभासदांनी सर्व ठरावांना एकमताने मंजुरी दिली.

Rajendra Patil Yadravkar News - Yadrav Co-operative Bank Jaysingpur
यड्राव बँकेची दैदिप्यमान वाटचाल: ४०० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार

या कार्यक्रमाचे स्वागत बँकेचे व्हा. चेअरमन दिलीप मगदूम यांनी केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीशैल नायकुडे यांनी सभेचे प्रास्ताविक व विषय वाचन केले.

या महत्त्वपूर्ण सभेला आदित्य पाटील-यड्रावकर, बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक व्ही. के. बस्तवडे, बँकेचे सर्व संचालक, पदाधिकारी, शेकडो सभासद व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सचिन देशिंगे यांनी मानले.

Banco News
www.banco.news