नोटा-नाणी बदलण्याबाबत रिझर्व्ह बँकचे नवे नियम लागू!

देशातील सर्व बँक शाखांना ग्राहकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही विनाशुल्क देवाणघेवाणीची सुविधा देणे बंधनकारक.
Master Direction – Facility for Exchange of Notes and Coins
Master Direction – Facility for Exchange of Notes and Coins
Published on
  • भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) "Master Direction – Facility for Exchange of Notes and Coins" जारी करून नोटा आणि नाण्यांच्या बदलाबाबतच्या सर्व विद्यमान सूचनांचे एकत्रीकरण केले आहे. हे मास्टर डायरेक्शन १ एप्रिल २०२६ पासून लागू झाले असून देशातील सर्व बँक शाखांना ग्राहकांसह सर्वसामान्य नागरिकांना नोटा व नाणी बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा सर्वसामान्य अनुभव आहे की बाजारात अनेक वेळा, विशेषत: 5 रु. च्या नोटा, 50 पैसे अशी चलने स्वीकारली जात नाहीत व ग्राहकास मनस्तापास सामोरे जावे लागते

Master Direction – Facility for Exchange of Notes and Coins
तुमच्याकडे २००५ पूर्वीच्या नोटा आहेत का? वाचा रिझर्व्ह बँकेचा नवीन नियम!

नव्या निर्देशानुसार प्रत्येक बँक शाखेने नवीन व चांगल्या दर्जाच्या नोटा व नाणी उपलब्ध करून देणे, खराब (Soiled), फाटलेल्या (Mutilated) व अपूर्ण (Imperfect) नोटांची देवाणघेवाण करणे तसेच सर्व मूल्यवर्गातील नाणी स्वीकारणे आवश्यक राहील. ही सुविधा केवळ खातेदारांसाठीच नव्हे तर इतर नागरिकांनाही उपलब्ध करून द्यावी लागेल.

आरबीआयने स्पष्ट केले आहे की कोणतीही बँक शाखा ५० पैसे, ₹१, ₹२, ₹५, ₹१० आणि ₹२० मूल्यवर्गातील कायदेशीर चलन असलेली नाणी स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. तसेच नोटा आणि नाणी बदलण्याची सुविधा सर्व कामकाजाच्या दिवशी भेदभाव न करता उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे

Master Direction – Facility for Exchange of Notes and Coins
२ लाखांच्या जुन्या नोटा, हायकोर्टाचा दणका आणि रिझर्व्ह बँकेला 'डेडलाईन'!

खराब नोटांच्या देवाणघेवाणीसाठी दिवसाला २० नोटा किंवा ₹५,००० पर्यंत रकमेची देवाणघेवाण काउंटरवर विनाशुल्क करावी लागेल. यापेक्षा जास्त नोटा स्वीकारून त्यांची रक्कम जास्तीत जास्त ७ दिवसांत खात्यात जमा करावी लागेल.

Master Direction – Facility for Exchange of Notes and Coins
होळीचा रंग नोटेला लागला? टेन्शन घेऊ नका! वाचा काय सांगतो रिझर्व्ह बँकेचा नियम...

फाटलेल्या किंवा अपूर्ण नोटांच्या बाबतीत दिवसाला १० नोटांपर्यंत तातडीने निर्णय घेऊन पैसे द्यावेत. त्यापेक्षा अधिक नोटा असल्यास पावती देऊन प्रक्रिया पूर्ण करावी आणि आवश्यक असल्यास ३० दिवसांच्या आत रक्कम खात्यात जमा करावी.

याशिवाय प्रत्येक शाखेत "SOILED / MUTILATED NOTES AND COINS ARE ACCEPTED AND EXCHANGED HERE" असा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधित बँकेवर आरबीआयच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते.

Attachment
PDF
Master Direction – Facility for Exchange of Notes and Coins
Preview

ठळक मुद्दे

  • सर्व बँक शाखांमध्ये नोटा व नाणी बदलण्याची सुविधा अनिवार्य.

  • खातेदारांसह इतर नागरिकांनाही सुविधा उपलब्ध.

  • खराब नोटा : २० नोटा किंवा ₹५,००० पर्यंत त्वरित विनाशुल्क देवाणघेवाण.

  • फाटलेल्या/अपूर्ण नोटा : १० नोटांपर्यंत तत्काळ प्रक्रिया.

  • कोणतीही शाखा कायदेशीर नाणी स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही.

  • नियमांचे उल्लंघन झाल्यास आरबीआयकडून दंडात्मक कारवाई शक्य.

Banco News
www.banco.news