रिझर्व्ह बँकेने फेटाळल्या ‘सोने विक्री’च्या अफवा : सोन्याचा साठा ८८०.५२ टन इतकाच कायम

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन; अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या
अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या
रिझर्व्ह बँकेने सोने विकल्याच्या बातम्या खोट्या
Published on

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या “रिझर्व्ह बँकेने सोने विकले” या बातम्यांचे खंडन केले आहे. रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले की,अशा प्रकारच्या बातम्या चुकीच्या असून बँकेच्या सोन्याच्या साठ्यात कोणताही बदल झालेला नाही.

३ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँकेच्या मासिक बुलेटिनमध्ये सोन्याच्या भौतिक साठ्याची माहिती नियमितपणे प्रसिद्ध केली जाते. सध्या रिझर्व्ह बँकेकडे असलेला सोन्याचा भौतिक साठा ८८०.५२ टन इतकाच कायम आहे.

अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या
न सोने, न जमीन! आता विनातारण मिळवा ₹२ कोटींचे कर्ज!

रिझर्व्ह बँकेने नागरिकांना अशा संवेदनशील विषयांमध्ये केवळ अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल मीडिया किंवा अप्रमाणित माध्यमांमधून पसरवल्या जाणाऱ्या अफवांपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या
सोने की बँक एफडी ? तुमचे पैसे कुठे सर्वात सुरक्षित असतील?

रिझर्व्ह बँकेच्या या स्पष्टीकरणामुळे सोन्याच्या साठ्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Attachment
PDF
Clarification on gold holdings
Preview
Banco News
www.banco.news