
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेने कर्मचाऱ्यांना ७ टक्के पगारवाढ देण्याचा करार मंजूर केला आहे. बँक व्यवस्थापन आणि बँक एम्प्लॉईज युनियन, कोल्हापूर यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष रोहित बांदिवडेकर आणि संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे यांच्या उपस्थितीत हा करार झाला. बँकेकडून रोहित बांदिवडेकर, उपाध्यक्ष सदानंद घाटगे, संचालक रवींद्र पंदारे, शशिकांत तिवले, मधुकर पाटील (एम.एस.) व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी, तर बँक एम्प्लॉईज युनियन, कोल्हापूर यांचे वतीने अध्यक्ष अतुल दिघे, महासचिव नारायण मिरजकर, सचिव प्रकाश जाधव यांनी करारावर सह्या केल्या.
या वेतनवाढीची अंमलबजावणी १ जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. यामुळे वाढलेल्या पगाराची फरक रक्कम कर्मचाऱ्यांना एकरकमी मिळणार आहे.