पुणे पीपल्स बँकेत मोठ्या पदांवर मेगा भरती सुरू.....तर लगेच अर्ज करा!

पुणे, ठाणे, बेळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमधील शाखांसाठी बँक अधिकार्यांचा शोध; १० दिवसांत करा अर्ज. वाचा सविस्तर माहिती.
Cooperative Bank Recruitment 2026 Maharashtra - Pune Peoples Bank News
जनरल मॅनेजर ते ग्राफिक डिझायनर... मुख्य कार्यालयासह ४ जिल्ह्यांतील शाखांमध्ये होणार नियुक्ती.
Published on

पुणे: बँकिंग क्षेत्रात वरिष्ठ आणि प्रशासकीय स्तरावर करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नामांकित सहकारी बँकांपैकी एक असलेल्या 'पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड' (मल्टीस्टेट बँक) कडून विविध संवर्गातील एकूण ३३ रिक्त जागांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ३,०६० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसायाचा टप्पा ओलांडलेल्या या बँकेला अधिक गतिमान आणि निकालभिमुख (Result-Oriented) बनवण्यासाठी अनुभवी आणि तरुण अधिकाऱ्यांची गरज असून, त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.

या भरती प्रक्रियेद्वारे बँकेच्या पुणे येथील मुख्य कार्यालयासह पुणे, ठाणे, बेळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध शाखांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये उच्च व्यवस्थापकीय पदांपासून ते तांत्रिक आणि प्रशासकीय पदांचा समावेश आहे.

बँकेने जारी केलेल्या जाहिरातीनुसार खालील पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे:

१. जनरल मॅनेजर (General Manager) - ०२ जागा

२. डेप्युटी जनरल मॅनेजर (Dy. General Manager) - ०४ जागा

३. डेप्युटी जनरल मॅनेजर - मुख्य कायदा अधिकारी (Chief Law Officer) - ०१ जागा

४. असिस्टंट जनरल मॅनेजर (Asstt. General Manager) - ०४ जागा

५. असिस्टंट जनरल मॅनेजर - गुंतवणूक (Investment) - ०१ जागा

६. ब्रँच मॅनेजर (Branch Manager) - १० जागा

७. ब्रँच मॅनेजर - बोर्ड सेक्रेटरी (Board Secretary) - ०१ जागा

८. ब्रँच मॅनेजर - इस्टेट मॅनेजर (Estate Manager) - ०१ जागा

९. ब्रँच मॅनेजर - कायदेशीर अधिकारी (Legal Officer) - ०३ जागा

१०. असिस्टंट ब्रँच मॅनेजर - मार्केटींग (Marketing) - ०२ जागा

११. असिस्टंट ब्रँच मॅनेजर - ग्राफिक डिझायनिंग (Graphic Designing) - ०२ जागा

१२. असिस्टंट ब्रँच मॅनेजर - स्टेनो/टायपिस्ट (Steno/Typist) - ०२ जागा

एकूण पदे - ३३

Cooperative Bank Recruitment 2026 Maharashtra - Pune Peoples Bank News
पुणे पीपल्स बँकेचा राष्ट्रीय पातळीवर तिहेरी सन्मान

शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अटी

प्रत्येक पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, वयोमर्यादा आणि इतर सर्व नियम व अटींची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, योग्य, हुशार आणि अनुभवी उमेदवारांच्या बाबतीत अटी व शर्ती शिथिल करण्याचे सर्व अधिकार बँकेच्या संचालक मंडळाने (Board of Directors) आपल्याकडे राखून ठेवले आहेत.

अर्ज कसा आणि कधीपर्यंत करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बँकेच्या www.punepeoples.bank.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तेथे उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे भरायचा आहे. हे अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत (जाहिरात दिनांक ०९ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झाली आहे) उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन सबमिट करावे लागणार आहेत. मुदतीनंतर आलेले किंवा अपूर्ण माहिती असलेले अर्ज थेट बाद केले जातील, अशी माहिती बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) दिली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा जाहिरातीत दिलेल्या 7066050999 / 7066051999 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.

Banco News
www.banco.news