१० व्या ऑल इंडिया अर्बन को-ऑप बँकिंग समिटमध्ये 'पुणे पीपल्स बँके'ला राष्ट्रीय पुरस्कार.

अमृत महोत्सवी वर्षात पुणे पीपल्स को-ऑप. बँकेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा - ग्राहकांचा विश्वास ठरला नंबर १!
Pune Peoples Bank Interest Rates and Amrit Mahotsav Award 2026
बँकिंग क्षेत्रात पुणे पीपल्स बँकेची मोठी झेप; राष्ट्रीय स्तरावर गौरव!
Published on

पुणे: सहकार बँकिंग क्षेत्रात आपल्या सातत्यपूर्ण प्रगती, पारदर्शक कारभार आणि नाविन्यपूर्ण कार्यपद्धतीच्या जोरावर स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि. ने आपल्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 'क्रेस्ट इन्फो मीडिया' यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित "१० व्या ऑल इंडिया अर्बन को-ऑप बँकिंग समिट अँड अवॉर्ड्स २०२६" मध्ये बँकेला राष्ट्रीय स्तरावरील "बेस्ट कस्टमर सर्व्हिस इनेशेटीव्ह" (Best Customer Service Initiative) या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

पुण्यातील हॉटेल 'दि वेस्टीन' (कोरेगाव पार्क) येथे ८ व ९ मे २०२६ दरम्यान हा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्याला देशभरातील २०० हून अधिक नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी, बँकिंग क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

हा मानाचा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड, उपाध्यक्ष श्री. बिपीनकुमार शहा, व्यवस्थापकीय मंडळाचे (Board of Management) अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, ज्येष्ठ संचालक श्री. जनार्दन रणदिवे, श्री. सुभाष नडे, श्री. विश्वनाथ जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. संजय घोडके आणि आयटी (IT) विभाग प्रमुख श्री. कैलास पवार यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.

Pune Peoples Bank Interest Rates and Amrit Mahotsav Award 2026
पुणे: बँक कर्मचारी संघातर्फे रक्तदान आणि आरोग्य शिबिर संपन्न

पुरस्काराबाबत कृतज्ञता व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड म्हणाले,

"हा पुरस्कार म्हणजे केवळ बँकेचा गौरव नसून, आमचे सन्माननीय सभासद, लाखो ग्राहक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक परिश्रमाचा आणि निष्ठेचा सन्मान आहे. ग्राहकांचा वाढता विश्वास आणि आमची पारदर्शक सेवा हीच आमची खरी ताकद आहे. भविष्यातही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांना अधिक सुलभ आणि सुरक्षित बँकिंग सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

अमृत महोत्सवी वर्षात 'सामाजिक बांधिलकी' आणि 'शाखा विस्तार'

पुणे पीपल्स बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून सामाजिक बांधिलकी जपणारी बँक आहे, याचा पुनरुच्चार अध्यक्षांनी केला. यावर्षी बँक आपले अमृत महोत्सवी वर्ष (७५ वर्षे) साजरी करत आहे. या सुवर्णमयी वर्षानिमित्त ग्रामीण आणि नागरी भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच आगामी काळात ग्राहकांच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावत नव्या शाखांचा विस्तार करण्यावर बँकेचा मुख्य भर असेल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

सक्षम नेतृत्व आणि आर्थिक स्थैर्याचे प्रतीक

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी बँकेच्या यशाचे सूत्र सांगताना तंत्रज्ञान आणि टीमवर्कचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले,

"आधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्यपूर्ण अवलंब, पारदर्शक व्यवहार आणि समर्पित ग्राहक सेवा या घटकांमुळेच बँक आज प्रगतीपथावर आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, संपूर्ण संचालक मंडळ, व्यवस्थापकीय समिती आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाले आहे."

व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते यांनीही भावना व्यक्त करताना सांगितले की, राष्ट्रीय स्तरावर सातत्याने मिळणारे हे पुरस्कार पुणे पीपल्स को-ऑप. बँकेच्या सक्षम नेतृत्वाचे, भक्कम आर्थिक स्थैर्याचे आणि उत्कृष्ट सेवाभावाचे जिवंत प्रतीक आहेत.

Pune Peoples Bank Interest Rates and Amrit Mahotsav Award 2026
पुणे पीपल्स को-ऑप. बँकेचे ज्येष्ठ संचालक ॲड. सुभाष मोहिते यांची राज्य सहकार धोरण समितीत निवड

सायबर सुरक्षेवर विशेष मार्गदर्शन

या दोन दिवसीय समिटमधील महत्वपूर्ण परिसंवादात पुणे पीपल्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी विशेष निमंत्रित म्हणून मार्गदर्शन केले. सध्याच्या डिजिटल युगात बँकिंग क्षेत्रापुढील आव्हाने लक्षात घेता त्यांनी "सायबर सिक्युरीटी (Cyber Security), डेटा प्रायव्हसी (Data Privacy) आणि ट्रस्ट (Trust)" या अत्यंत संवेदनशील विषयांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले, ज्याचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक झाले.

अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असतानाच मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्कारामुळे पुणे पीपल्स को-ऑप. बँकेचे सहकार क्षेत्रातून आणि सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.

Banco News
www.banco.news